चेन्नईत धक्कादायक घटना, YSR काँग्रेसच्या खासदाराच्या लेकीनं फुटपाथवरील व्यक्तीला चिरडलं, तातडीनं जामिनावर सुटका
Accident : चेन्नईत सोमवारी रात्री वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार बीदा मस्तान राव यांची मुलगी माधुरी बीदा हिनं रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं आहे.
चेन्नई : आंध्र प्रदेशमधील वायसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार बीदा मस्तान राव (Rajya Sabha MP Beeda Mastan Rao) यांची मुलगी माधुरी बीदा (Madhuri Beeda) हिनं फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरुन बीएमडब्ल्यू गाडी चालवून चिरडल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्रातील पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच चेन्नईमधील (Chennai ) या घटनेनं खळबळ उडाली आहे. ही घटना चेन्नईतील बसंत नगर भागात सोमवारी रात्री घडली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव सूर्या असून त्याचं वय 21 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे
सूर्या पेंटिंगची कामं करत असल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी तो फुटपाथवर झोपला होता. खासदाराच्या मुलीनं बीएमडब्ल्यूनं चिरडल्यानं सूर्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार या घटनेच्यावेळी मृत तरुण बसंत नगरच्य फुटपाथवर सोमवारी रात्री झोपला होता. एक महिला अलिशान गाडी चालवत होती त्या कारनं त्या व्यक्तीला चिरडल्यचं पोलिसांनी म्हटलं.
माधुरी बीदाला जामीन मंजूर
माधुरी बीदानं फुटपाथवर झोपलेल्या सूर्या नावाच्या तरुणाला चिरडलं. सूर्या कथितपणे दारुच्या नशेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावेळी तो फुटपाथवर झोपला होता. माधुरी बीदा आणि तिच्या मैत्रिणीसह स्थानिकांशी वाद घालतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्या व्हिडीओत माधुरी बीदा हिनं रुग्णवाहिका बोलावली असल्याचा दावा केला होता. सूर्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली होती, असा दावा इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
YSRCP Rajya Sabha MP Beeda Masthan Rao’s daughter Madhuri (33) was arrested for a #HitandRun case, she allegedly ran over a 24 year old painter, while sleeping on a pavement in #BesantNagar, #Chennai. Madhuri was later granted bail.#BeedaMasthanRao #YSRCP pic.twitter.com/PkbeM0lth5
— Surya Reddy (@jsuryareddy) June 18, 2024
स्थानिकांनी माधुरी बीदा आणि तिची मैत्रीण घटनास्थळावरुन लगेचच फरार झाल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सूर्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन कारवाई केली द अडायर ट्रॅफिक इनवेस्टिगेशन विंगकडून भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खासदाराच्या मुलीला नंतर जामीन मंजूर करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूर्याच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे योग्य पावलं उचलण्यात आली आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि शेजारी जे-5 शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला पोहोचले होते. त्यांनी या घटनेप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली.
संबंधित बातम्या :