एक्स्प्लोर

Sanjay Raut: छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार, ठाकरे गटात प्रवेश करणार का? संजय राऊत म्हणाले....

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार का, याविषयी भाष्य केले. छगन भुजबळ हे अजितदादा गटात नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यांना राज्यसभेवर जायचे होते. पण अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना संधी दिली.

मुंबई: आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचा आता कोणताही संबंध नाही. छगन भुजबळ आणि शिवसेनेत बोलणी सुरु आहेत, अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.   

यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले. छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्याला बराच काळ उलटला. त्यानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता अजितदादा गटात आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यामुळे आपण बोलताय त्या अफवेत तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही, तो होण्याची शक्यता नाही. कारण भुजबळांनी स्वत:चा मार्ग निवडला आहे. त्यांच्या आताच्या भूमिकांशी शिवसेनेच्या भूमिका मेळ खाणार नाहीत. ते शिवसेनेत येणार अशा बातम्या उडवून महाराष्ट्रात गोंधळ उडवला जात आहे. पण छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, भेटणारही नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

तेलुगू देसमचा प्रस्ताव आला तर नक्की विचार करु: संजय राऊत

भविष्यात तेलुगू देसम पक्षाकडून काही प्रस्ताव आला तर इंडिया आघाडीकडून त्याचा नक्कीच विचार केला जाईल. आम्ही गप्प बसणार नाही, जिथं जिथं संधी मिळेल आम्ही विरोध करणार, असे संजय राऊत यांनी म्हटले. आज आमचा 58 वा वर्धापन दिनय आहे. शिवसेना ही बेईमान लोकांना छातीवर घेऊन नाही तर निष्ठावंतांनी शिवसेना इथपर्यंत आणली आहे. डबल इंजिनवाली युती मग ट्रिपल झाली, मग मनसेला सोबत घेतलं... काय झालं? अजून काही छुपे इंजिनपण आहेतच. त्यांनी आता महाराष्ट्रात 400 पार करावेत, आमची काहीत हरकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

छगन भुजबळ यांचं म्हणणं काय?

छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याविषयी 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात त्यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, तसंच कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

आणखी वाचा

छगन भुजबळ यांची इच्छा मारली जाते याची किंमत कदाचित मोजावी लागेल; अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget