नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी मविआचे दिग्गज नेते मैदानात; नवनिर्वाचित खासदारांची प्रचारासाठी आघाडी
दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या बाबतीत मतदारांची गफलत होऊ नये, यासाठी स्वतः निवडणुकीत सहभाग घेतला असून ते स्व: ता प्रचार करताना दिसत आहेत.
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक (Nashik) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची मतदान प्रक्रिया अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) संदीप गुळवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे तर, महायुतीने (Mahayuti) शिंदे यांच्या शिवसेनेकडून किशोर दराडे (Kishor Darade) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना कडवे आव्हान देण्यासाठी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय. यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची होणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभेप्रमाणेच नाशिकची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक देखील नामसाधर्म्यामुळे चर्चेत आली आहे.
नवनिर्वाचित खासदार निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात
महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्याच नावाचे अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे सर यांच्या नावाचे भगरे सर म्हणून पक्ष उमेदवार निवडणुकीत उमेदवारी करत होते. त्यामुळे मुख्य लढतीपैकी अपक्ष उमेदवाराला एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या बाबतीत मतदारांची गफलत होऊ नये, यासाठी स्वतः निवडणुकीत सहभाग घेतला आहे. संदीप गुळवे यांच्या निवासस्थानी जाऊन प्रचाराचा आढावा घेतला आणि संदीप गुळवे यांना सल्लाही दिला. नामसाधर्म्यामुळे विरोधकांनी निवडणुकीच्या स्तर घसरवला असल्याची टीका विरोधकांवर करत महाविकास आघाडीचे उमेदवार गुळवे निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
....तर ब्रुनुकसानीचा दावा दाखल करतो- विवेक कोल्हे
अशातच, नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यावर विरोधी उमेदवार किशोर दराडे यांनी अनेक आरोप केले आहेत. कोल्हे यांच्यावर जमीन बळकावल्याचा देखील आरोप झाला , मात्र याबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की, जर संबंधितांनी आरोप करताना थेट माझे नाव घेतले असेल तर मी आजच त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करतो. पण त्यांनी केवळ विरोधकांनी जमीन बळकावली असं म्हंटल असेल तर मला त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येणार नाही. या उलट दराडे यांच्या संस्थेतच 19 वर्षाचा शिक्षक होतो. 75 वय असलेला शिक्षक त्यांच्या संस्थेत आढळतो, 9वी पास झालेला शिक्षक मतदारयादीत आढळून येतो, शेतात काम करणारा शेतमजूर देखील त्यांनी त्यांच्या संस्थेत शिक्षक दाखवला आहे. असा गंभीर आरोप कोल्हे यांनी केला.
सर्व शिक्षक त्यांना या निवडणुकीत उत्तर देतील
विवेक कोल्हे हे भाजपचे पदाधिकारी असताना देखील ते नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत आहेत. त्यामुळे कोल्हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत यावर बोलताना नाराजी वैगरे काही नाही. ही निवडणूक शिक्षकांशी संबंधित आहे. त्यामुळे पक्षाच्या झालर विरहित ही निवडणूक मी लढवावी, अशी अनेक शिक्षकांनी अपेक्षा व्यक्त केलीय. म्हणून मी अपक्ष उमेदवारी करत असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान कोल्हे यांचे विरोधी उमेदवार दराडे यांनी कोल्हे यांच्यावर डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना याबाबत कोणताही पुरावा नाही. उलट कोल्हे आडनाव असलेले दोन डमी उमेदवार त्यांच्याच संस्थेतील कर्मचारी असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले. सोबतच शिक्षकांना त्यांनी अशिक्षित समजण्याचे पाप केले. त्यामुळे सर्व शिक्षक त्यांना या निवडणुकीत उत्तर देतील, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके आणि विवेक कोल्हे यांच्यात जवळीक पाहायला मिळाली, विवेक कोल्हे हे भाजपचे पदाधिकारी असतांनाही त्यांनी निलेश लंके यांना मदत केल्याची चर्चा रंगली होती.कोल्हे आणि लंके दोघेही चर्चेत राहिल्याबाबत विचारले असता जो समाजात काम करतो, अन्यायाविरोधात आवाज उठवतो त्याला लोक डोक्यावर घेतात. कदाचित या गोष्टी आमच्या दोघांमध्येही सारख्याच असल्याने लोकांमध्ये आमच्याबाबत चर्चा होत असेल, असं कोल्हे म्हणाले. सोबतच येणाऱ्या काळात नगर जिल्ह्यातील राजकारणात काही बदल दिसतील का? या प्रश्नांवर बोलताना बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे बदल होत असतात. त्यामुळे येत्या काळात काही बदल झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही असं कोल्हे म्हणाले. मागील काही दिवसांपासून विवेक कोल्हे आणि महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष सर्वांनी बघितला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलतील याबाबत विवेक कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकिय चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या