एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रपती निवडणूक : राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू चर्चेसाठी सोनिया गांधींकडे!
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी दाखल झाले आहेत. या भेटीत राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी आता अवघे काही आठवडे उरले असताना, भाजपने सहमतीचा उमेदवार देण्याबाबत चाचपणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली. केंद्रातल्या तीन वरिष्ठ मंत्र्यांचा यात समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा या समितीत समावेश आहे.
राष्ट्रपतीपदाबाबत सहमतीचा उमेदवार निवडण्यासाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ एनडीएच नव्हे, तर इतर विरोधी पक्षांशीही चर्चा ही समिती करणार आहे. याचाच एक भाग म्हणून राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत.
28 जून ही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. एनडीए सहमतीचा उमेदवार देण्यात अपयशी ठरली, तरच विरोधक राष्ट्रपती निवडणुकीत आपला उमेदवार दाखल करतील असं विधान नुकतंच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी दाखल केलेलं होतं. हे विधान एनडीएच्या पथ्यावरच पडणार आहे. पण जरी लढाईची वेळ आली तरी आकड्यांच्या गणितात एनडीएच मजबूत असून, आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement