एक्स्प्लोर
VIDEO : माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेज कोसळलं

टोंक (राजस्थान) : राजस्थानमधील टोंकमध्ये माळी समाजाच्या कार्यक्रमात हजेरी लावलेले माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं स्टेज अचानक कोसळलं. यानंतर तिथे काहीकाळ गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. टोंकमध्ये माळी समाजाने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री नमोनारायण मीणा, माजी मंत्री जकिया इनाम आणि अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र त्यांचा भार न पेलल्याने स्टेज एकाएकी तुटला. अशोक गहलोत यांचं भाषण संपल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली, परिणामी स्टेज तुटलं. आयोजकांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण आणलं. त्यामुळे या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























