List Of Cancelled Trains : थंडी आणि धुक्याचा परिणाम; रेल्वेने रद्द केल्या 481 गाड्या
कडाक्याच्या थंडीबरोबरच अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने 481 गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.
List Of Cancelled Trains : देशभरात विविध भागात थंडी वाढली आहे. कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. धुक्यामुळे रेल्वेच्या 481 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी NTES (नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम) वर जाऊन तुम्ही प्रवास करणारी रेल्वे सुरू आहे का तपासा. NTES वर तुम्हाला तुमच्या रेल्वेची संपूर्ण माहिती मिळेल.
कडाक्याच्या थंडीबरोबरच अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमच्या अधिकृत वेबसाइटवर रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे.
या मेल-एक्स्प्रेस गाड्या झाल्या आहेत रद्द
22406 आनंद विहार - भागलपूर गरीब रथ (24 जानेवारी रोजी रद्द)
22405 भागलपूर-आनंद विहार गरीब रथ (23 जानेवारी रोजी रद्द)
13499 भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस (23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द)
डाऊनमध्ये भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस 23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द
13236 दानापूर-साहिबगंज
13235 साहिबगंज-दानापूर इंटरसिटी एक्सप्रेस (24 ते 28 जानेवारीपर्यंत रद्द)
15553 जयनगर- भागलपूर (24 ते 28 जानेवारीपर्यंत रद्द)
15554 भागलपूर-जयनगर एक्सप्रेस (23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द)
13242 राजेंद्रनगर- बांका (24 ते 26 जानेवारीपर्यंत रद्द )
13241 बांका-राजेंद्रनगर इंटरसिटी (25ते 27 जानेवारी पर्यंत रद्द)
साहिबगंज-जमालपूर, भागलपूर-जमालपूर, जमालपूर-क्यूल दरम्यान धावणाऱ्या 9 पॅसेंजर ट्रेन्स 22 ते 28 जानेवारी दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
या रेल्वे गाड्यांच्या मार्गात झाले बदल
481 गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. 13409/13410 मालदा-क्यूल या 28 जानेवारीपर्यंत भागलपूर स्टेशनपर्यंतच धावतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
Indian Railways New Rules : रात्रीच्या रेल्वे प्रवासात गोंगाट करणाऱ्यांना दणका, रेल्वेची नवी नियमावली
एक्सप्रेस गाडी थांबवून प्रवाशाला दिली औषधे, रेल्वे प्रशासनाची सतर्कता