एक्स्प्लोर
राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे आकाशात हेलकावे, घातपाताचा संशय
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हुबळी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी काल (शुक्रवार) दिल्लीहून हेलिकॉप्टरने हुबळी येथे गेले होते. हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने ते हवेतच हेलकावे घेऊ लागलं. हेलिकॉप्टर लॅण्ड करताना वातावरणही स्वच्छ होतं. त्यामुळे हेलिकॉप्टर अचानक हेलकावे का घेऊ लागलं? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सदर हेलिकॉप्टर ताब्यात घेऊन वैमानिकाची चौकशीही सुरु केली असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रशासन याबाबत नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. VIDEO :
आणखी वाचा























