एक्स्प्लोर

Iran Israel War :  परदेशात असणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी, सुचनांचं पालन करण्याचं आवाहन 

इराण आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.

Iran Israel War : इराण आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानं जगात चिंताजनक परिस्थिती आहे. या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, सुचनाचे पालन करावे

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 24 x7 हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन : +970592916418
ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)
फोन : 00974-55647502
ईमेल : cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया)
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण)
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत
फोन : +96565501946
ईमेल : community.kuwait@mea.gov.in

बाहरीन
फोन : 00973-39418071

मस्कत
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन
फोन : 00962-770 422 276

बगदाद (इराक)
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट :eoibaghdad.gov.in
ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका असा संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भारताची मोठी कोंडी झाली आहे. तिन्ही देशांशी भारताचे असलेले संबंध पाहता परिस्थिती आव्हानात्मक आहे. भारत आणि इस्रायलचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहेत. तर इराण आणि भारताची मैत्री बरीच जुनी आहे. सामरिक आणि आर्थिक बाजूंचा विचार केल्यास इराणचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धात अमेरिका इस्रालयच्या बाजूनं आहे. त्यामुळे परराष्ट्र संबंध, धोरण सांभाळताना भारताची गोची होणार आहे. अमेरिका आणि इस्रायलने आज (28 जानेवारी) इराणवर संयुक्त हल्ला चढवला. गेल्या काही आठवड्यांपासूनच अमेरिकेनं यासाठीची तयारी सुरु होती. आता युद्धाला सुरुवात झाली आहे. काही देशांनी इराणला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जगात दुफळी माजण्याची चिन्हं आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Us Israel vs Iran War: जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget