एक्स्प्लोर
राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरला!
राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस नेते शहजाद पुनावाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे, अशी टीका केली आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष असतील. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती असतील. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार!
काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे 900 नेते उपस्थित
राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे देशभरातील 900 नेते काँग्रेस मुख्यालयात उपस्थित होते. राहुल गांधींच्या उमेदवारीचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नेते दिल्लीतील अकबर रोड इथल्या मुख्यालयात दाखल झाले होते.
काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, अध्यक्षपदाच्या निवणुकीत 10 AICC सदस्यांनी उमेदवारासाठी प्रस्ताव ठेवणं आवश्यक असतं. मिळालेल्या माहितीनुसार, 10 AICC सदस्यांचे 90 ग्रुपने राहुल गांधींचा प्रस्ताव दिला.
काँग्रेसच्या इतिहासातील काळा दिवस
दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस नेते शहजाद पुनावाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे, अशी टीका केली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून निवड प्रक्रिया
स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement