एक्स्प्लोर
विजेंदरचा विजय, मोदींच्या घोषणा, प्रेक्षकांकडून राहुल गांधींची हुर्यो
नवी दिल्ली : भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशनचा आशिया पॅसिफिक मिडलवेटचा चॅम्पियन ठरलाय. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची प्रेक्षकांनी हुर्यो उडवली.
नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये शनिवारी झालेला हा सामना पाहण्यासाठी आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. मात्र राहुल गांधींसमोरच प्रेक्षकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे राहुल गांधींचा चेहरा पडला. पंतप्रधान मोदींच्या नावे घोषणाबाजी झाल्यानंतर राजीव शुक्ला आणि राहुल गांधी यांनी काढता पाय घेतला.
व्यावसायिक बॉक्सिंग लढतीत विजेंदरनं ऑस्ट्रेलियाच्या केरी होपचा 22 गुणांनी पराभव केला. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगचा हा सलग सातवा विजय ठरला. या लढतीअखेर तिन्ही पंचांनी 98-92, 98-92, 100-90 असा विजेंदरच्या बाजूनं कौल दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement