Rafale M Deal : चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानची झोप उडणार; भारतच समुद्राचा खरा 'बादशाह', नौदलात सामील होणार 26 राफेल-एम
Rafale M Deal : भारतीय नौदलाला नव्या पिढीच्या लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी नौदलाच्या राफेलच्या खरेदीच्या प्रस्तावाला केंद्रं सरकारनं मंजुरी दिली आहे.
Rafale M Deal : चिनी ड्रॅगन (China) आणि पाकिस्तानची (Pakistan) झोप उडणार आहे. कारण आता भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. लवकरच 26 सागरी लढाऊ विमानं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. भारतानं फ्रान्सकडून 26 राफेल आणि 3 फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) या प्रस्तावाला मंजुरी दिली. नौदलाच्या राफेलमुळे भारतीय नौदलाच्या लष्करी पराक्रमाला चालना मिळणार आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या युद्धसरावानंतर राफेल खरेदी प्रस्तावाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एवढंच नाही तर ही सागरी लढाऊ विमानं भारतीय नौदलाचे ऑपरेशन्स आणि गरजांसाठी पूर्णपणे अनुकूल असल्याचंही डेमोच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. भारतीय नौदलाची ही नवी 26 सागरी लढाऊ विमानं आता आधीपासूनच नौदलात असलेल्या 36 राफेलच्या ताफ्यात सामील होणार आहेत. भारतीय वायुसेनेसाठी फ्रान्सकडून यापूर्वीच 36 राफेल खरेदी करण्यात आली आहेत.
राफेलमुळे आता भारताला वायूसेनेसोबतच नौदलाचीही ताकद आणखी वाढणार आहे. तसेच, राफेलचे दोन्ही एडिशन (हवाई आणि नौदल) आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर फ्रान्सच्या धर्तीवर लष्करी पर्याय स्वीकारणारा भारत हा पहिला देश बनेल.
डसॉल्ट एविएशनचे अध्यक्ष म्हणतात...
डसॉल्ट एविएशनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी म्हटलं की, आम्ही भारतीय सैन्यासह आमच्या भागीदारीचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत, मी या नव्या आत्मविश्वासाबद्दल भारतीय अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो आणि Dassault Aviation च्या वतीनं वचन देतो की, आम्ही राफेलसह भारतीय नौदलाच्या इतरही अपेक्षा पूर्ण करू."
खर्च 85,000 कोटी रुपये असू शकतो
संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, राफेलसह, शस्त्रास्त्र प्रणाली आणि सुट्या भागांसह सहायक उपकरणांची खरेदी आंतर-सरकारी करारावर (आयजीए) आधारित असेल. तसेच, किंमत आणि खरेदीच्या इतर अटींबाबत फ्रान्स सरकारशी चर्चा केली जाईल. या 2 महत्त्वाच्या प्रकल्पांची किंमत 80,000 ते 85,000 कोटी असू शकते. पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना हा महत्त्वाचा करार झाला आहे.
भारताची पुढील तयारी काय?
पंतप्रधान मोदी बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च संस्था असलेल्या DAC नं खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच, भविष्यातील प्रगत मध्यम लढाऊ विमानासह (AMCA) पुढील पिढीच्या विमानांना उर्जा देण्यासाठी भारतात लढाऊ जेट इंजिन विकसित करण्यासाठी भारतीय आणि फ्रेंच अधिकारी फ्रेंच संरक्षण प्रमुख सफ्रान यांच्याशी चर्चा करत आहेत.
Dassault Aviation म्हणजे काय?
डसॉल्ट एव्हिएशन ही लष्करी विमानं आणि व्यावसायिक जेटची फ्रेंच निर्माता कंपनी आहे. Dassault Aviation नं 90 पेक्षा जास्त देशांना 10,000 हून अधिक लष्करी आणि नागरी विमानं (2,700 Falcons सह) वितरित केली आहेत. यासह राफेलच्या सर्व प्रकारच्या विमानांचं डिझाईन, विकास, विक्री आणि समर्थन यामध्ये डसॉल्ट एव्हिएशननं जगभरात ओळख मिळवली आहे. सन 2022 मध्ये, Dassault Aviation ने 6.9 अब्ज युरोचा महसूल नोंदवला. या कंपनीत 12,700 कर्मचारी काम करतात.