एक्स्प्लोर
धक्कादायक...! मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव ठेवलेल्या गोव्यातील कला अकादमीचं शुद्धीकरण केल्याचा आरोप
पर्रिकरांचं पार्थिव ठेवल्यामुळं कला अकादमीचं शुद्धीकरण सुरु असल्याची माहिती मिळाल्याचं प्रभुणे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात प्रभुणे यांनी सोशल मीडियावर कला अकादमीमधल्या कर्मकाडांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या गोव्यातल्या कला अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या मनस्विनी प्रभुणे यांनी केला आहे. कला अकादमीमध्ये मंत्रोच्चारासह होमहवन सुरू होतं. त्यावेळी मनस्विनी प्रभुणे यांचे पती राजू नायक तिथं उपस्थित होते. VIDEO | पर्रिकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं शुद्धीकरण? | पणजी | एबीपी माझा अधिक चौकशी केली असता पर्रिकरांचं पार्थिव ठेवल्यामुळं कला अकादमीचं शुद्धीकरण सुरु असल्याची माहिती मिळाल्याचं प्रभुणे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात प्रभुणे यांनी सोशल मीडियावर कला अकादमीमधल्या कर्मकाडांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. दरम्यान कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी होमहवनसारखे प्रकार घडल्याची माहिती नसल्याचं सांगितलं आहे. मात्र मनस्विनी प्रभुणेंच्या फेसबुक पोस्टनंतर कला अकादमीतल्या कथित प्रकारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनोहर पर्रीकरांचे पार्थिव शरीर कला अकादमीमध्ये ठेवलं होतं म्हणून संपूर्ण अकादमीचे शुध्दीकरण करत होते. सरकारी वास्तूंचे शुध्दीकरण करायला लागले तर कसं होईल. सरकारी वास्तूंमध्ये असले कार्यक्रम करायला नको. मग मिरामार बीचचं पण शुध्दीकरण करणार का? उगाचंच चुकीचे पायंडे कशाला पाडायचे, असे प्रभुणे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























