एक्स्प्लोर

लाडक्या आयपीएसला भेटायला पंजाबची तरुणी मध्य प्रदेशला

पंजाबमधील एक तरुणी आपल्या लाडक्या पोलिस अधिकाऱ्या भेटायला शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन मध्य प्रदेशला आली.

चंदिगढ : फक्त अभिनेते, क्रिकेटपटू यांचेच क्रेझी फॅन्स असतात, असं नाही! पंजाबचे एसपी (पोलिस अधीक्षक) सचिन अतुलकर यांचेही चाहते देशभरात पसरले आहेत. पंजाबमधील एक तरुणी आपल्या लाडक्या पोलिस अधिकाऱ्या भेटायला शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन मध्य प्रदेशला आली. 34 वर्षीय सचिन अतुलकर यांच्या फिटनेस आणि लूक्समुळे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये राहणारी 27 वर्षांची तरुणी तीन दिवसांपूर्वी उज्जैनमध्ये दाखल झाली. अतुलकरांना भेटण्याचा हट्टच तरुणीने धरला आहे. त्यामुळे तिचं मन वळवून तिला परत पाठवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. 'एसपी अतुलकरांच्या कार्यालयात आणि ते उपस्थिती लावत असलेल्या कार्यक्रमांना ती तरुणी हजर राहते आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न करते. ती अत्यंत आडमुठी आहे. पोलिसांनीी अखेर तिला सुधारगृहात नेलं' अशी माहिती एका महिला पोलिस अधिकाऱ्याने दिली. 'सोशल मीडियावर अतुलकर यांचे फोटो पाहिले, तेव्हा त्यांची बॉडी आणि लूक्स पाहून आपण घायाळ झाल्याचं ती सांगते. आम्ही तिच्या पालकांना इथे बोलवून घेतलं. पण ती आई-वडिलांसोबत परत जायलाही तयार नाही.' असंही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. अतुलकरांची भेट मिळाली, तरच आपण घरी जाऊ, असं तरुणीचं म्हणणं आहे. संबंधित तरुणी मानसशास्त्र विषयात द्विपदवीधर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तिला नागदा रेल्वे स्थानकावर नेऊन पंजाबला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवलं, मात्र तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारण्याची धमकी दिली. इतकंच काय तर मागेल ते खाणं-पिणं तिला पुरवलं जात आहे. अगदी पिझ्झासुद्धा तिला दिला जात आहे. पोलिस काऊन्सिलरच्या मदतीने तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कामाचा भाग म्हणून आपण कोणाचीही भेट घेण्यास तयार आहोत, मात्र वैयक्तिक कारणांसाठी आपल्या मनाविरुद्ध भेटण्याची जबरदस्ती कोणीही करु शकत नाही, असं सचिन अतुलकर यांनी सांगितलं. 'मी सागर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक असताना एका सात वर्षांच्या मुलाच्या पालकांनी मला विनंती केली होती. माझी स्वाक्षरी मिळाली, तरच जेवेन असा हट्ट त्या चिमुरड्याने धरला होता. मी त्याचा आग्रह मोडला नाही' असा किस्साही अतुलकरांनी सांगितला. सचिन अतुलकर अविवाहित आहेत. फिटनेस फ्रीक असल्यामुळे ते दररोज 70 मिनिटं जिममध्ये जातात. भोपाळमध्ये झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अतुलकरांनी फिटनेससाठी अनेक बक्षिसंही पटकावली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget