एक्स्प्लोर

शोकाकूल वातावरणात शहीद परमजीत सिंह यांना अखेरचा निरोप

श्रीनगर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पंजाबचे वीरपुत्र परमजीत सिंह यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंजाबमधील तरनतारण या मूळगावी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या, अशी मागणी तिथे उपस्थित जनसमुदायाने केली. दरम्यान "परमजीत यांचं संपूर्ण शरीर मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. मला माझ्या पतीचं संपूर्ण शरीर हवं आहे," अशी भूमिका परमजीत यांच्या पत्नीने घेतली होती. "जर शरीर छिन्नविछिन्न झालं आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री अमरिंदर सिंह भेटायला येणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही," असंही परमजीत सिंह यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या. अखेर अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर कुटुंब अंत्यसंस्कार करण्यास तयार झालं. paramjeet-wife भारताचं चोख प्रत्युत्तर indian-army1-580x3951-580x394 जम्मू काश्मीरमध्ये पुंछ सेक्टरकच्या कृष्णा खोऱ्यात भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने जोरदार कारवाई करत पाकिस्तानच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या या दोन्ही लष्करी तळावर 647 मुजाहिद बटालियनचे सुमारे 10 ते 16 सैनिक तैनात होते. शहीदांची विटंबना Terrorist-580x324 पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अक्शन टीमने (BAT) भारतीय सीमेत 250 मीटर आत घुसखोरी करत गोळीबार केला. यानंतर भारतीय जवांनाच्या मृतदेहांची विटंबना करत, बीएसएफचे जवान परमजीत आणि प्रेम सागर यांचं शीर धडापासून वेगळं करुन घेऊन गेले. बॉर्डर अक्शन टीमच्या 647 मुजाहिद बटालियनने घुसखोरीसाठी पाकिस्तान लष्कराकडून किरपान आणि पिंपल पोस्टमधूर कव्हर फायरिंग केली होती सैन्याचे जेसीओ आणि बीएसएफचे हेडकॉन्स्टेबल शहीद paramjeet पुंछमध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये सैन्याचे जेसीओ नायब सूभेदार परमजीत सिंह आणि बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांचा समावेश आहे. परमजीत सिंह 1995 पासून देशाच्या सेवेसाठी सैन्यात दाखल झाले होते. तर शहीद प्रेम सागर हे बीएसएफच्या 200 व्या बटालियनमध्ये तैनात होते. ते 1994 मध्ये बीएसएफमध्ये सामील झाले होते. मागील तीन वर्षांपासून ते जम्मूच्या सांबामध्ये तैनात होते. अमानवी कृत्य, भारत उत्तर देणार : संरक्षणमंत्री Arun_Jaitley पुंछमधील हल्ल्याचा सरकारने जोरदार निषेध केला आहे. हल्ल्याचा निषेध करताना संरक्षण मंत्री अरुण जेटली म्हणाले की, "आमच्या शेजारच्या देशाने कृष्णा खोऱ्यात दोन जवानांना मारुन त्यांची विटंबना केली. हे अमानवी कृत्य आहे. युद्धादरम्यान अशा घटना होत नाहीच, पण शांतीदरम्यानही होत नाहीत. संपूर्ण देशाचा सैन्यावर विश्वास आहे. भारत हल्ल्याचं चोख उत्तर देणार. शहीदांचं बलिदान वाया जाणार नाही. पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक? पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. जाणकारांच्या मते, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सातत्याने कठोर पावलं उचलायला हवीत. म्हणजेच पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकसारखाच मोठ्या सर्जरीची गरज आहे. भारताचा आरोप चुकीचा दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावरील गोळीबाराचं तसंच जवानांची विटंबना केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. "पाकिस्ताने सैन्याने कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं नाही. जवानांची विटंबना केल्याचा आरोप चुकीचा आहे. पाकिस्तानी लष्कर प्रोफेशनल आहे आणि ते जवानांसोबत अपमानजनक कृत्य करत नाही", असं पाकिस्तानने म्हटलं आहे. संबंधित बातम्या पाकच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त भारताचं सडतोड उत्तर पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget