एक्स्प्लोर
Advertisement
ISIS च्या संपर्कात आलेल्या पुण्यातील तरुणीला काश्मीरमध्ये बेड्या
सादिया शेख बंडगार्डन रोडवरील एका शाळेत शिकत होती. सादियाला दहावीत 90 टक्के मार्क होते. अकरावीला तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता.
पुणे : प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील एका 18 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. सादिया शेख असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी मानवी बॉम्ब बनण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सादिया शेख बंडगार्डन रोडवरील एका शाळेत शिकत होती. सादियाला दहावीत 90 टक्के मार्क होते. अकरावीला तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आयसिसच्या संपर्कात आली होती. सीरियात मेडिकलला प्रवेश देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
आयसिससोबत संपर्क करण्याचा प्रयत्न तिने सुरु केला. यासाठी मोहम्मद सिराजुद्दीन नावाच्या व्यक्तीने तिला मदत केली. मूळचा कर्नाटकातील असणारा सिराजुद्दीन हा राजस्थान मधील जयपूरमधे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. मात्र त्याचवेळी तरुणांना कट्टर इस्लामकडे ओढण्याचे त्याचे प्रयत्नही सुरु होते.
तिच्या वागणुकीत आणि पेहरावात बदल झाला होता. जीन्स-टी शर्ट सोडून ती हिजाब घालायला लागली. इतकंच नाही तर ती धार्मिक बाबीतही रुची घेऊ लागली होती.
ही बाब तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एटीएसशी संपर्क साधला. एटीएसने मौलवीच्या मदतीने तिचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्या संपर्कात राहणार नाही, असं तिने त्यावेळी सांगितलं होतं. यानंतर ती सुधारल्याचं समजलं जात होत.
एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतरही सादिया शेख पुन्हा आयसिसच्या संपर्कात आली. ती काश्मीरमध्ये असल्याची समजल्यानंतर काश्मीर पोलिसांनी याची माहिती 23 जानेवारीला पुणे पोलिसांना पत्राद्वारे दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी सादियाच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आहे. ती सध्या कुठे आहे हे सांगू शकत नाही, अस तिच्या आईने सांगितल्याचं पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement