एक्स्प्लोर
Advertisement
Pulwama terror attack : भारताचे जवान गुन्हेगारांना शिक्षा देतील, थोडं थांबा : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी यवतमाळमधील पांढरकवडा येथे सभा घेतली.
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी यवतमाळमधील पांढरकवडा येथे सभा घेतली. या सभेत मोदी म्हणाले की, "भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या सर्व गुन्हेगारांना भारतीय लष्कर शिक्षा देईल. त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी, त्यांनी शोधून त्यांचा हिशेब चुकता केला जाईल. परंतु नागरिकांनी थोडा धीर धरायला हवा."
नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज मोदींच्या हस्ते यवतमाळसह धुळ्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींसह केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते.
मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की, "देशाच्या प्रगतीसाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्यात भारताचे आतोनात नुकसान झाले आहे. सर्व भारतीयांना त्याचे दुःख आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रानेदेखील त्यांचे दोन वीर जवान गमावले आहेत. शहीदांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही."
मोदी म्हणाले की, "ज्यांनी भारतावर हा भ्याड हल्ला केला, ते कुठेही लपले तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. भारतीय सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफ जवानांच्या रागाने परिसिमा गाठली आहे. मी त्यांची भावना समजतो. त्यामुळेच सरकारने जवानांना संपूर्ण मोकळीक दिली आहे.
Prime Minister Narendra Modi in Yavatmal, Maharashtra: Terror organisations who have committed this crime, no matter how much they try to hide, they will be punished. Security forces have been given full freedom. #PulwamaAttack pic.twitter.com/ULPOSUH3w2
— ANI (@ANI) February 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement