एक्स्प्लोर
सोनं तस्कराच्या पोटात तब्बल 14 सोन्याची बिस्कीटं!
रझाकवर झालेल्या शस्त्रक्रियेत त्याच्या पोटात 100 ते 150 ग्रॅमची 14 सोन्याची बिस्किटं आढळून आली.
विशाखापट्टणम : विशाखापट्टणम विमानतळावर कस्टम विभागानं टाकलेल्या धाडीत सोनं तस्करी करणाऱ्याच्या पोटात तब्बल 14 सोन्याची बिस्किटं सापडली आहेत.
रविवारी 54 वर्षीय रझाक श्रीलंकेवरून विशाखापट्टणम विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी तपासणी दरम्यान, तो पोटातून सोन्याची तस्करी करत असल्याचं कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आलं. त्यानंतर त्याला केजीएच रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
रझाकवर झालेल्या शस्त्रक्रियेत त्याच्या पोटात 100 ते 150 ग्रॅमची 14 सोन्याची बिस्किटं आढळून आली. याआधीही रझाकनं अशाच प्रकारे सोन्याची तस्करी केल्याची कबुली स्वत: रझाकनंच दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement