एक्स्प्लोर
केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला
आसनलसोल (पश्चिम बंगाल) : केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री बाबूल सुप्रियो यांच्या ताफ्यावर जमावानं हल्ला केला. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये ही घटना घडली आहे.
ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्यानं यामध्ये सुप्रियो किरकोळ जखमी झाले आहेत. तृणमुल कॉंग्रेसने हा हल्ला केल्याचा संशय सुप्रियो यांनी व्यक्त केला आहे.
आसनसोलमधील एका रॅलीमध्ये सुप्रीयो आले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यावेळी एक दगड सुप्रियो यांनाही लागला त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले.
त्यानंतर घटनास्थळी कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
व्हिडीओ पाहा
WATCH: Stone hurled at Union minister Babul Supriyo in Asansol, West Bengal pic.twitter.com/ecOG9os16t
— ANI (@ANI_news) October 19, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
बॉलीवूड
Advertisement