काय आहे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना?
स्वातंत्र्य दिनी मोदींनी देशातील सामान्य जनतेला मोठी भेट दिली. स्वातंत्र्य दिनाला मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा केली.
नवी दिल्ली : भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्लावरून पाचव्यांदा देशाला संबोधित केलं. स्वातंत्र्य दिनी मोदींनी देशातील सामान्य जनतेला मोठी भेट दिली. स्वातंत्र्य दिनाला मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा केली.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा देशातील गरिबात गरीब व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजना' सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. पंडित दीनदयाल यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरूवात केली जाणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे यापुढे देशातील कोणतंही गरीब कुटुंब उद्ध्वस्त होणार नसल्याचंही मोदी यांनी म्हटलं.
काय आहे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना?
- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. या योजनेअंतरर्गत 50 कोटी लोकांना आरोग्य विमा देण्याचा प्रस्ताव आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील जनेतेला चांगली आरोग्य सुविधा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबांतील सदस्य संख्येबाबत कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेअंतर्गत सामान्य जनतेला केवळ आर्थिक निकषांच्या आधारावर लाभ दिला जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत रुग्णांना त्यांच्या सुविधेनुसार सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा पुरवली जाणार आहे.
- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा निश्चित केलेली नाही. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला आधारकार्डची सक्ती असणार नाही.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेन इंडियाच्या दृष्टीने या योजनेला पूर्णपणे कॅशलेस ठेवण्यात आलं आहे. या योजनेचे प्रीमियम राज्य आणि केंद्र सरकारतर्फे भरले जाणार आहेत. प्रीमियमची 40 टक्के रक्कम राज्य आणि 60 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून भरली जाईल.
- या योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी ट्रान्सपोर्ट अलाउन्स लाभार्थ्याला मिळणार आहे. या योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी देशभर जवळपास दीड लाख आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या
गरीब कुटुंबासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'ची घोषणा
स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे
नेहरु, मनमोहन, वाजपेयी ते मोदी, लाल किल्ल्यावर कुणाचं किती मिनिटे भाषण?
2022पर्यंत अंतराळात तिरंगा फडकणार- मोदी
आम्ही चार वर्षात जे केलं, त्यासाठी शंभर वर्ष कमी पडली असती- मोदी