चांदी 4222 रुपयांनी तर सोनं 2841 रुपयांनी झालं स्वस्त, गेल्या चार दिवसात मोठी घसरण
सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 4 दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Gold Silver Rate : सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 4 दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 20 मे 2024 रोजी चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. या दिवशी चांदीची किंमत 95,267 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती. परंतु तेव्हापासून चांदीच्या किंमत दररोज घसरण होत आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
गेल्या चार दिवसात चांदी 4,222 रुपयांनी स्वस्त
गेल्या चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. सोन्या चांदीच्या किंमती कमी हो असल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सोने 74367 रुपयांवरुन 71500 रुपयांच्या आसपास घसरले आहे. सोन्याच्या किंमतीत ही घसरण मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दिसून आली आहे. तर 20 मे 2024 रोजी चांदीने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला होता. या दिवशी चांदीची किंमत 95,267 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती. परंतू, तेव्हापासून त्याची किंमत दररोज घसरत आहे. मात्र, आज त्याची किंमत किलोमागे 600 रुपयांनी वाढली आहे. एमसीएक्सवर 5 जूनच्या फ्युचर्ससाठी एक किलो चांदीचा भाव हा 91045 रुपये आहे. अशा स्थितीत गेल्या चार दिवसात चांदी 4,222 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
चार दिवसात सोने 2,841 रुपयांनी झालं स्वस्त
सध्या सोन्याचा भाव 71,526 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 20 मे रोजी सोन्याचा भाव 74367 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आता 71,526 रुपयांवर आला आहे. अशा स्थितीत चार दिवसांत सोने 2,841 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.
सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा
गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. वाढत्या सोन्या चांदीच्या दरामुळं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. त्यामुळं सोनं चांदी खरेदी करावं की नको असा सवाल खरेदीदारांच्या मनात येत होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सोन्या चांदीच्या दराच्या बाबतीत दिलासादायक बातम्या समोर येत आहेत. सोन्या चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. या काळात सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, दरात वाढ होत असल्यानं ग्राहकांनी सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र होतं. मात्र, आता दरात घसरण होत असल्यामुळं सोन्या चांदीची खरेदी सुरुझाली आहे.
महत्वाच्या बातम्या: