एक्स्प्लोर
लोकशाही मूल्यांविषयी कटिबद्ध राहायला हवं; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशवासियांना आवाहन
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहुयात, असं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात देशवासियांना केलं.
नवी दिल्ली : उद्या साजऱ्या होत असलेल्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशावासियांना संबोधित केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाने आपल्याला काही अधिकार बहाल केलेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवं, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना केलं. देशातील अनेक विषय आणि योजनांवर राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात भाष्य केलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
स्वच्छ भारत अभियान -
नागरिकांच्या सहभागामुळे 'स्वच्छ भारत अभियानाने' खूप कमी दिवसात चांगले यश मिळवले आहे. लोकसहभागाची हिच भावना अन्य क्षेत्रांमध्येही असायला हवी. मग ते गॅसची सबसिडी सोडणे असो किंवा डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे असो.
उज्ज्वला योजना -
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून लोकांच्या घराघरात गॅस पोहचला. माहितीनुसार आठ कोटी जनतेनी याचा लाभ घेतला आहे.
देशाच्या प्रत्येक भागाचा विकास होणार -
जम्मू काश्मीर, लडाख असो की ईशान्येकडील राज्य असो. देशाच्या प्रत्येक भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करीत आहे.
लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवं -
संविधानाने आपल्याला लोकशाही अधिकार दिले आहेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी -
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 14 कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रतिवर्ष मिळत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना सन्मामाने जगण्यासाठी मदत मिळाली.
जलशक्ती मंत्रालय -
पाण्याच्या संकटाशी लढण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. जलसंरक्षण ही या मंत्रालयाची प्राथमिकता आहे. मला विश्वास आहे, की 'जल जीवन मिशन' सुद्धा स्वच्छ भारत अभियानासारखे यशस्वी होईल.
जीएसटी -
जीएसटीमुळे एक देश, एक कर, एक बाजार, या संकल्पनेला मूर्त स्वरुप मिळाले. यासोबतच 'ई-नाम' द्वारे 'एका राष्ट्रासाठी एक बाजार'ची प्रक्रिया यशस्वी होईल.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -
सरकारने आपल्या महत्वकांशी योजनांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या योजनांमधून आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहचवण्यास मदत झाली.
National Bravery Award | महाराष्ट्रातील दोन मुलांचा बाल शौर्य पुरस्काराने सन्मान | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement