एक्स्प्लोर

‘लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी एकमत व्हावं’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात “लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी सर्वपक्षियांचं एकमत व्हावं,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात “लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी सर्वपक्षियांचं एकमत व्हावं,” अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय, देशातल्या प्रत्येक गरिब व्यक्तीला पोटभर जेवण मिळायला हवं, यासाठी फूड सिक्युरिटी बिल प्रभावीपणे राबवण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. तसेच, तीन तलाकचा कायदा लवकरच संसदेत नावारुपाला येईल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. लोकसभा- विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होण्यासंदर्भात राष्ट्रपती म्हणाले की, “देशाच्या प्रत्येक भागात सुरु असलेल्या निवडणुकांमुळे त्याचा शासन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. सलगच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शिवाय, निवडणुकांच्या निमित्ताने आचार संहिता लागू होण्याने विकासाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासंदर्भात सर्वांनी, गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. तसेच यावर सर्व पक्षांचं एकमत व्हावं,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तिहेरी तलाक विधेयकावरही राष्ट्रपतींनी यावेळी भर दिला. “माझ्या सरकारने तीन तलाक संदर्भात एक विधेयक संसदेत सादर केलं आहे. संसदेकडून याला मंजुरी मिळून, लवकरच त्याचे कायद्यात रुपांतर होईल. तीन तलाकवर कायदा झाल्यास, मुस्लीम भगिनी आणि मुलींना आत्मसन्मानाने जीवन जगता येईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय, उद्योग, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, गरीबांना घरं, रेल्वेचं अत्याधुनिकीकरण आदी विषयांवर सरकारने केलेल्या कामावर प्रकाश झोत टाकला. तसेच, 130 कोटी जनतेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, आज मोदी सरकार अर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला. या आर्थिक पाहणी अहवालात पुन्हा 'अच्छे दिन'चं स्वप्न दिसू लागलं आहे. कारण 2018-19 या आर्थिक वर्षात विकास दर 7.5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, भारत ही सर्वात वेगानं विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे, आणि त्याचा फायदा देशाच्या विकासासाठी होईल असंही नमूद करण्यात आलं आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Rahul Gandhi SC Petition : राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Embed widget