एक्स्प्लोर
राष्ट्रपती निवडणूक : काँग्रेसकडून मीराकुमार यांना उमेदवारी
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या विरोधात काँग्रेस आणि विरोधकांनी मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधकांच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यासंदर्भात घोषणा केली.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात 16 विरोधीपक्षांची गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीएम, सीपीआयसह इतर पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोण आहेत मीरा कुमार ?
मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू
माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.
1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी
1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या
1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी
2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे
2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेड पक्ष विरोधकांपैकी एक महत्वाचा पक्ष आहे. पण नितीश कुमार यांनी विरोधकांना पाठ दाखवल्याने विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्र आहे.
काँग्रेसनं मीरा कुमार यांचं नाव घोषित केलं असलं तरी एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
मतांची आकडेवारी काय सांगते?
एनडीएकडे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी सध्या 5 लाख 32 हजार मतं आहेत. ओडिशातील सत्ताधारी पक्ष बीजेडीनेही रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. बीजेडीकडे 37 हजार 257 मतं आहेत.
एनडीएला दक्षिणेकडील दोन प्रमुख पक्ष वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसनेही पाठिंबा दिला आहे. तर नितीश कुमार यांची 20 हजार 779 मतंही एनडीएच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एनडीएकडे एकूण 6 लाख 29 हजार 658 मतं आहेत. तर निवडणूक जिंकण्यासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज आहे. म्हणजेच एनडीएकडे बहुमतापेक्षाही जास्त मतं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement