एक्स्प्लोर
प्रशांत किशोर जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी
16 सप्टेंबर 2018 रोजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड या पक्षात प्रवेश केला. त्याआधी त्यांन बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जेडीयूला विजय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते.
पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मोठा वाटा असलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना जेडीयूमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना जेडीयूचं राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे आता जेडीयूत क्रमांक दोनचे नेते असतील.
16 सप्टेंबर 2018 रोजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड या पक्षात प्रवेश केला. त्याआधी त्यांन बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जेडीयूला विजय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू बिहारमधून एकत्र निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे यावेळीही प्रशांत किशोर यांची जादू चालली, तर नितीश कुमार यांची राजकारणातली पत वाढलेच, सोबत प्रशांत किशोर यांच्यावरही आगामी काळात आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात.
प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया :
जेडीयूमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयानंतर प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं की, "जेडीयूचा प्रस्ताव मला गेल्या अनेक दिवसांपासून होता, मात्र आता ही योग्य वेळ आहे. सरकारमध्ये असो वा पक्षात, नितीश कुमार जी जबाबदारी सोपवतील ती मी योग्यरित्या पार पाडेल." आता त्यांच्याकडे जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रशांत किशोर यांची कारकीर्द निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते. 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून काम केल्यानंतर प्रशांत किशोर हे नितीश कुमार यांच्या संपर्कात आले. 2015 साली बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेडीयूसाठी रणनिती आखली. 'बिहार में बाहर हो, नितीश कुमार हो' यासारख्या घोषणा प्रशांत किशोर यांचीच कल्पना आहे.जदयू और पार्टी के नेतृत्व का इस ज़िम्मेदारी और सम्मान के लिए हृदय से आभार। नीतीश जी की न्याय संग विकास की विचारधारा और बिहार के प्रति मैं प्रतिबद्ध हूँ |
— Prashant Kishor (@PrashantKishor) October 16, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement