एक्स्प्लोर
Advertisement
प्रमोद सावंत गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी, पर्रिकरांच्या निधनानंतर काही तासातच शपथविधी
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदावर सभापती प्रमोद सावंत बसतील हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर भाजप नेते आणि गोव्याचे सभापती प्रमोद सावंत विराजमान होणार आहेत. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आजच होणार आहे. प्रमोद सावंत यांना रात्री 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोन आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार आहे.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणीबाणीच्या परिस्थितीत भाजपने घटक पक्षांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला राजकीय पेचप्रसंग अखेर संपला आहे.
पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग आणि गोवा विधानसभा जागांचं गणित!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सध्या गोव्यात आहेत. सोमवारी सायंकाळी शाह, ढवळीकर आणि सरदेसाई यांची बैठक झाली. या बैठकीत हा तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. प्रमोद सावंत हे दोन वेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतु आता त्यांना थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळत आहे.मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल
मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप चर्चेनंतर राजी झाला आहे. मगोपकडे तीन आमदार असून या तिघांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रीपदं मिळतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement