एक्स्प्लोर

प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस

शाळेचे समन्वयक जेईस थॉमस आणि रायन ग्रुपच्या उत्तर भारत विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस यांना अटक करण्यात आली आहे.

गुरुग्राम : गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे. शाळेचे समन्वयक जेईस थॉमस आणि रायन ग्रुपच्या उत्तर भारत विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जेजेए कायद्याच्या कलम 75 अंतर्गत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरीकडे रायन इंटरनॅशनल ग्रुपचे सीईओ रायन पिंटो यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला आहे. यावर उद्या सुनावणी होईल. त्यामुळे उद्या त्यांना जामीन मिळतो की अटक होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. रायन इंटरनॅशनल ग्रुपचं मुख्यालय मुंबईत आहे. वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची नोटीस प्रद्युम्नच्या वडिलांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, हरियाणा सरकार, सीबीआय, सीबीएसई आणि रायन स्कूलला नोटीस जारी केली आहे. "हा फक्त एका मुलाचा नाही तर संपूर्ण देशातील मुलांचा प्रश्न आहे," असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तीन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. प्रद्युम्नच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करावी, जेणेकरुन सत्य समोर येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या गुरुग्राममध्ये शुक्रवारी सकाळी सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाची शाळेच्याच बस कंडक्टरने गळा चिरुन हत्या केली. हत्येपूर्वी बस कंडक्टरने प्रद्युम्नच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला होता. आरोपी कंडक्टर अशोक कुमारने हत्येची कबुली दिली आहे. परंतु या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. gurugram-murder शाळेची भूमिका संशयास्पद मात्र या संपूर्ण प्रकरणात रायन इंटरनॅशनल स्कूलची भूमिका मोठी संशयास्पद आहे. प्रद्युम्न हत्या प्रकरणाच्या तपासासाठी तपास यंत्रणा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. उत्तर विभागात रायन इंटरनॅशलनच्या 23 शाळा आहेत. त्यापैकी दिल्ली एनसीआरमधील 11 शाळांचा समावेश आहे. पोलिसांवरही कारवाई या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. रायन इंटरनॅशनल स्कूल ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतं, त्याच्या पोलिस इन-चार्जचं निलंबन केलं आहे. पालक आणि मीडियावर लाठीचार्ज केल्याने ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचं प्रद्युम्नच्या पालकांना आश्वासन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज प्रद्युम्नच्या वडिलांशी फोनवरुन बातचीत केली. ज्या यंत्रणेकडून किंवा हवा तसा तपास करायचा असेल, तशा तपासासाठी आम्ही तयार आहोत. यावर प्रद्युम्नच्या वडिलांनी मुख्यमंत्री खट्टर यांचे आभार मानले. कोर्टाने रायन स्कूलची बाजू लढवणार नाही : बार असोसिएशन   कोणताही वकील कोर्टात रायन स्कूलची बाजू लढवणार नाही, असा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. यापूर्वी बार असोसिएशनने हत्येचा आरोपी अशोक कुमारचं खटला न लढण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget