एक्स्प्लोर
LIVE : तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत मतदानाला सुरुवात

चेन्नई : तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या तीन राज्यात आज विधानसभा मतदान होणार आहेत. सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. तामिळनाडूमध्ये 234 , केरळमध्ये 140 तर पुद्दुचेरीत 30 जागांवर मतदान होणार आहे. केरळच्या तिरूअनंतपुरमची लढाई चुरशीची ठरणार आहे. कारण भाजपनं क्रिकेटर श्रीसंतला उमेदवारी दिली आहे.
केरळमध्ये पंतप्रधान मोदींनी किती पाठंबा मिळतो, याची सर्वांनाच उत्सुकता या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तान लागली आहे. कारण केरळमध्ये कायम डाव्यांचं वर्चस्व राहिलं आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक, द्रमुक-काँग्रेस, भाजप आघाडी यांच्यात चुरस रंगणार आहे. जयललिता यांनी जाहिरनाम्यातून आश्वासनांची खैरात केली असून, त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाला जनता कसा प्रतिसाद देते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
केरळमध्ये पंतप्रधान मोदींनी किती पाठंबा मिळतो, याची सर्वांनाच उत्सुकता या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तान लागली आहे. कारण केरळमध्ये कायम डाव्यांचं वर्चस्व राहिलं आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक, द्रमुक-काँग्रेस, भाजप आघाडी यांच्यात चुरस रंगणार आहे. जयललिता यांनी जाहिरनाम्यातून आश्वासनांची खैरात केली असून, त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाला जनता कसा प्रतिसाद देते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. आणखी वाचा























