एक्स्प्लोर

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश

पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मोठा वाटा असलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश करत प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

त्यामुळे प्रशांत किशोर येत्या काळात जेडीयूमध्ये आणि बिहार सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतील. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना नंबर दोनचं पद देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे.

प्रशांत किशोर पक्ष आणि सरकार यांच्यात मध्यस्थीचं काम करणार आहेत. याशिवाय येत्या काळात प्रशांत किशोर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा आहेत. प्रशांत किशोर यांना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे निकटवर्तीय मानलं जातं.

मात्र त्यांच्या जेडीयूतून प्रत्यक्ष राजकीय सुरुवातीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रशांत किशोर यांच्या जेडीयू प्रवेशानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये खळबळ माजली आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्वीट करत जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.

जेडीयूमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयानंतर प्रशांत किशोर यांनी म्हटलं की, "जेडीयूचा प्रस्ताव मला गेल्या अनेक दिवसांपासून होता, मात्र आता ही योग्य वेळ आहे. सरकारमध्ये असो वा पक्षात, नितीश कुमार जी जबाबदारी सोपवतील ती मी योग्यरित्या पार पाडेल."

काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीने लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे केला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 48 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 11 टक्के लोकांनी पसंती दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.

प्रशांत किशोर यांची कारकीर्द

निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता.

यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget