एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फेसबुकवर मुलगी असल्याचं भासवून प्रेमात पाडलं, तरुणाची हत्या
फेसबुकवर फ्रेण्डशिप झालेल्या 'मुलीला' भेटायला गेला होता. पण तिथे पोहोचल्यावर त्याला कळलं की, ज्याला तो मुलगी समजत होतो, तो प्रत्यक्षात पुरुष होता.
चेन्नई : सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. कारण फेसबुकवर महिला बनून प्रेमात पाडणाऱ्या एका तरुणाची पोलिसानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कन्नन कुमार असं आरोपी पोलिसाचं नाव असून तो 32 वर्षांचा आहे. तर मृत तरुणाचं नाव एस अय्यानार असं आहे. आरोपी पोलिसाने तीन साथीदारांच्या मदतीने तरुणाची हत्या केली.
आरोपी कन्नन कुमारने विरुधनगर जिल्ह्यातील त्याच्या गावाला जाण्यासाठी दहा दिवसांची सुट्टी घेतली होती. फेसबुकवर फ्रेण्डशिप झालेल्या 'मुलीला' भेटायला गेला होता. पण तिथे पोहोचल्यावर त्याला कळलं की, ज्याला तो महिला समजत होता, तो प्रत्यक्षात पुरुष होता.
"फेसबुकवर एस अय्यानारने मुलीच्या नावाने फेक अकाऊंट ओपन केलं होतं. तो कन्ननसोबत नाजूक आवाजात बोलत असे. पण सत्य कळल्यावर कन्नन अतिशय निराश झाला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत अय्यानारच्या हत्येचा कट रचला," असं पोलिसांनी सांगितलं.
तपास अधिकाऱ्याने सांगितलं की, "आरोपी कन्नन पसार झाला आहे, तर त्याच्या विजयकुमार, तमिलरासन आणिर तेंजिंग या मित्रांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement