मेहुल चोकसीविरोधात कारवाईचा फास आवळला
मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी गुआनामध्ये भारताच्या राजदूतांनी अॅण्टिगाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक मेहुल चोकसी याच्याभोवती कारवाईचा फास आवळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुआनामध्ये भारताच्या राजदूतांनी अॅण्टिगाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे. मेहुल चोकशी सध्या अॅण्टिगामध्येच आहे. अॅण्टिगा सरकारला चोकसीच्या प्रत्यार्पणासाठीची सीबीआयची कॉपीदेखील देण्यात आलेली आहे.
चोकसीच्या प्रत्यार्पणासंदर्भातील गेल्या दीड वर्षातील ही तिसरी भेट आहे. चोकसीला भारतात पाठवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चाही झाल्याचं समजत आहे. अॅण्टिगाचे अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल याप्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती अॅण्टिगाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे.
याआधी अॅण्टिगाच्या पंतप्रधानांनी चोकसीला भारतात पाठवण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान कार्यालयाने चौकशी यंत्रणांना आणि परराष्ट्र मंत्रालायला चोकसीवरील आरोपांची सविस्तर माहिती अॅण्टिगा सरकारला देण्याचे निर्देश दिले होते.
पीएनबी घोटाळ्याशी माझा संबंध नाही- चोकसी 2000 सालानंतर माझा पंजाब नॅशनल बँकेशी कोणताही संबंध नव्हता, या घोटाळ्याबाबत ज्या-ज्या कारवाई करण्यात आल्या, त्या कोणत्याही नोटिसेशिवाय करण्यात आल्याचे आरोपही चोकसीने केलेत. केवळ राजकारणापोटी मला अडकवलं जातंय, मी कोणताही घोटाळा केला नाही. तसेच, घोटाळाच झाला नाही, असाही दावा मेहुल चोकसीने केला. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी शीला रावल यांनी अॅण्टिगामध्ये मेहुल चोकसीची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली.
पाहा मेहुल चोकसीची संपूर्ण मुलाखत :महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets