(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार!
IPL 2024 : संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. राजस्तानचा विस्फोटक सलामी फलंदाज जोस बटलर यानं उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे.
IPL 2024 : संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. राजस्तानचा विस्फोटक सलामी फलंदाज जोस बटलर यानं उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. जोस बटलर मायदेशी परतला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार सामन्याची टी20 मालिका होणार आहे. त्यासाठी जोस बटलर यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 22 मे ते 30 मे यादरम्यान चार टी 20 सामन्याची मालिका पार पाडणार आहे. त्यानंतर टी20 विश्वचषकाचा थरार होणार आहे. जोस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या संघाची धुरा आहे. त्यामुळे बटलर यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज, सोमवारी जोस बटलर मायदेशी परतला. राजस्थान रॉयल्सने जोस बटलरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
राजस्थान रॉयल्सकडून माहिती -
राजस्थान रॉयल्सने जोस बटलरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जोस बटलर हॉटेलमधून बाहेर पडत असताना दिसत आहे. त्यानं सर्व खेळाडूंची गळाभेटही घेतली. त्यानंतर गाडीमध्ये बसून जाताना आयपीएल चषक जिंका अशी इच्छा व्यक्त केली. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'मैनु विदा करो' हे गाण वाजत आहे, त्यामुळे राजस्थानचे चाहते जास्त भावूक झाले आहेत. व्हिडीओ पोस्ट करताना राजस्थानने जोस भाई तूला खूप मिस करु.. असे म्हटले आहे.
इंग्लंडचे हे खेळाडूही मायदेशी परतणार?
प्लेऑफ आणि फायनलमधून इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतली आहे. पाकिस्तानविरोधात टी20 मालिका आणि त्यानंतर टी20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना काढता पाय घेतला आहे. जोस बटलर याच्याशिवाय मोईन अली, विल जॅक्स, फिलिप सॉल्ट यांच्यासह इंग्लंडचे खेळाडू आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत.
पाकिस्तानविरोधात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, विल जॅक्स, फिल साल्ट आणि रीस टोप्ली यांचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. हे सर्व खेळाडू या आठवड्यात मायदेशी परतू शकतात. पंजाबसाठी जॉनी बेयरस्टो आणि सॅम करन खेळत आहे. पंजाबचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. विल जॅक्स आणि रीस टोप्ली आरसीबीसाठी खेळत आहेत. हे दोन्ही खेळाडू गेल्यास आरीसीबीला धक्का बसणार आहे. त्याशिवाय मोईन अली जाण्यानं चेन्नईलाही फटका बसणार आहे.
We’ll miss you, Jos bhai! 🥺💗 pic.twitter.com/gnnbFgA0o8
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 13, 2024
यंदाच्या हंगामात जोस बटलरची कामगिरी -
यंदाच्या हंगामात जोस बटलरने शानदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्ससाठी जोस बटलर यानं 11 सामन्यात 359 धावा चोपल्या आहेत. ायमध्ये दोन शतकाचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात दोन शतकं ठोकणारा बटलर एकमेव खेळाडू आहे.