ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण?
IPL 2024 Most sixes : विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शिवम दुबे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव हे फलंदाज विराट कोहलीच्या आसपासही नाहीत.
IPL 2024 Most sixes : आयपीएल 2024 मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडतोय. फलंदाजांकडून गोलंदाजांची कत्तल केली जात आहे. यंदाच्या हंगामात अनुभवी विराट कोहलीचं वेगळेच रुप सर्वांना पाहायला मिळत आहे. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवरुन आयपीएलआधी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण विराट कोहलीने आपल्या खेळातून सर्वांनाच चोख प्रत्युत्तर दिले आहे. विराट कोहलीनं यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला आहे. आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप विराट कोहलीच्याच डोक्यावर आहे. त्याशिवाय सर्वाधिक षटकार आणि चौकार मारणाऱ्या फलंदाजामध्येही विराट कोहली मागे नाही. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शिवम दुबे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव हे फलंदाज विराट कोहलीच्या आसपासही नाहीत. विराट कोहली यानं आपल्या खेळात अमुलाग्र बदल करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. स्ट्राईक रेटवरुन प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना विराटनं जोरदार प्रत्युत्तर दिलेय.
आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण?
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 155.16 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. विराट कोहलीने पॉवरप्लेच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने आतापर्यत 33 षटकार ठोकले आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर हैदराबादचा अभिषेक शर्मा आहे. अभिषेक शर्माने 12 सामन्यात 35 षटकारांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने 13 सामन्यात 33 षटकार ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कोलकात्याचा सुनील नारायण आहे, त्याने 32 षटकार ठोकले आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या ट्रेविस हेड याने 31 षटकार टोकले आहेत. राजस्थानचा रियान पराग पाचव्या क्रमांकावर आहे. परागने 12 सामन्यात 31 षटकार ठोकले आहेत. शिवम दुबे याने 13 सामन्यात 28 षठकार ठोकले आहेत. ऋषभ पंत याने 12 डावात 25 षटकारांचा पाऊस पाडला आहे. रोहित शर्माने 13 सामन्यात 20 षटकार ठोकले आहेत. सूर्यकुमार यादव याने 10 सामन्यात 18 षटकार लगावले आहेत.
चौकार ठोकण्यातही विराट मागे नाही -
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजात विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम ट्रेविस हेड याच्या नावावर आहे. हेड याने 11 सामन्यात 61 चौकार ठोकले आहेत. ऋतुराज गायकवाड याने 13 सामन्यात 58 चौकार लगावले आहेत. विराट कोहलीने 56 चौकार ठोकले आहेत. फिलिप सॉल्ट याने 50, साई सुदर्शन 48 तर सुनिल नारायण याने 46 चौकार लगावले आहेत.
ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या डोक्यावर -
यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली यानं 13 सामन्यात 661 धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने 66.10 च्या सरासरीने आणि 155.16 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची पिटाई केली. विराट कोहलीने एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत. ऋतुराज गायकवाड 583 धावांसह दुसऱ्या तर हेड 533 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. साई सुदर्शन यानं 527 धावा केल्यात, तो चौथ्या स्थानावर आहे. संजू सॅमसन याच्या नाावर 486 धावा आहेत. रिायन पराग 483 धावांसह सहाव्या स्थानावर आहे.