![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'ला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईक जास्त!
पंतप्रधान मोदींच्या कालच्या 'मन की बात'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळत आहेत. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला.
![पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'ला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईक जास्त! PM Narendra Modis Mann Ki Baat gets dislikes more than likes on youtube channel पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'ला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईक जास्त!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/31202744/Mann-Ki-Baat-Like-n-Dislike.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (30 ऑगस्ट) 'मन की बात' रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. परंतु कालच्या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सुरु आहेत. कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळत आहे. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला.
पीएमओच्या यू ट्यूब अकाऊंटवर 'Prime Minister Narendra Modi's Mann ki Baat with Nation' असं शिर्षक असलेला कार्यक्रम 30 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित झाला होता. हा कार्यक्रम 37 हजार जणांनी लाईक केलं होतं, तर 69 हजार पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ डिसलाईक केला होता. म्हणजे कार्यक्रम पसंत करणाऱ्यांपेक्षा नापसंत करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे.
याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या यू ट्यूब चॅनलवरील व्हिडीओला 47 हजार जणांनी लाईक केलं असून डिसलाईची संख्या जवळपास सव्वालाखांपेक्षा जास्त आहे. एक लाख 23 हजार जणांनी व्हिडीओ डिसलाईक केला आहे.
तर दुसरीकडे भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर मन की बात या कार्यक्रमाला सकाळी 11.40 वाजेपर्यंत 51 हजार लोकांनी लाईक केलं होतं तर 3 लाख 87 हजार लोकांनी हा कार्यक्रम डिसलाईक केला होता.
याशिवाय दूरदर्शनवरही पंतप्रधान मोदींच्या कालच्या 'मन की बात'ला लाईकपेक्षा डिसलाईक जास्त होते. या व्हिडीओला 3 हजार 900 लाईक्स मिळाले असून 6 हजार 300 जणांनी डिसलाईक केलं आहे.
इतर यू ट्यूब चॅनलवरील मोदींच्या कार्यक्रमाला नापसंती केवळ पीएमओ किंवा भाजपच्याच यू ट्यूब अकाऊंटवर नाही तर ज्या ज्या वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान मोदींचा 'मन की बात' हा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित केला, किंवा पूर्ण व्हिडीओ अपलोड केला तिथेही हीच परिस्थिती होती. एबीपी न्यूजसह सर्वांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे.
बऱ्याच कमेंट्स नीट आणि जेईई परीक्षांबाबत! विशेष म्हणजे या कार्यक्रमावर कमेंट्सही बऱ्याच आल्या आहेत. त्यापैकी अनेक कमेंट्स या नीट आणि जेईई परीक्षांशी संबंधित होत्या. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी या परीक्षांबाबत बोलतील अशी अपेक्षा होती, पण भ्रमनिरास झाल्याचं अनेकांनी म्हटलं. तर काहींनी बेरोजगारी, नोकरभरीत, एनटीपीसी घोटाळ्यावर भाष्य न केल्याने पंतप्रधान मोदींवर टीका केली.
पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्द्यांवर बोलले? 30 ऑगस्टच्या मन की बातमध्येही पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानावर भाष्य केलं. खेळण्यांचा उद्योग सुरु करण्याचं तसंच कम्प्युटर गेम्स बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)