एक्स्प्लोर

मातीची शपथ, मी देशाचं नाव लुप्त होऊ देणार नाही, मोदींचं आश्वासन

'या मातीची शपथ, मी देशाचं नाव लुप्त होऊ देणार नाही. मी देश थांबू देणार नाही. मी देशाला कोणासमोर वाकू देणार नाही. हे भारतमातेला वचन आहे. या मातीची शपथ, मी देशाचं नाव लुप्त होऊ देणार नाही.' असं आश्वासन नरेंद्र मोदींनी राजस्थानातील चुरुमधल्या सभेत दिलं.

चुरु (राजस्थान) : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून साडेतीनशे दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित हातात असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशाला लुप्त होऊ देणार नाही, या 2014 मधील घोषणेचा पुनरुच्चार मोदींनी केला. राजस्थानातील चुरुमध्ये एका जाहीर सभेत मोदी बोलत होते. 'या मातीची शपथ, मी देशाचं नाव लुप्त होऊ देणार नाही. मी देश थांबू देणार नाही. मी देशाला कोणासमोर वाकू देणार नाही. हे भारतमातेला वचन आहे. या मातीची शपथ, मी देशाचं नाव लुप्त होऊ देणार नाही.' असं मोदी म्हणाले. 'देशापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. देशसेवा करणाऱ्या प्रत्येकाला, राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या प्रत्येकाला प्रधानसेवकाचं नमन' असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी शहीदांच्या कुटुंबीयांना आणि माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं. राजस्थानातील हजारो कुटुंबांसोबत देशभरातील 20 लाखांहून अधिक जवानांच्या कुटुंबाला 'वन रँक..'चा लाभ मिळाला असेल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात 'जैश ए मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर, धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ आणि मेहुणा युसुफ अजहर यांचा खात्मा झाला आहे. या हल्ल्यात हिटलिस्टवर असणाऱ्या 25 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात बालाकोटमध्ये असलेले 'जैश ए मोहम्मद'चे 350 दहशतवादी ठार झाले आहेत. 325 दहशतवादी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आलं आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला. पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असा ठरला अॅक्शन प्लॅन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या हल्ल्याच्या वेळी अॅक्शन रुममध्ये उपस्थित होते. सूत्रांच्या मते दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना काही पर्याय दिले होते. लष्कर आणि वायुसेनेने एलओसीजवळ हवाई पाहणी केली. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या कॅम्पला निशाणा बनवण्यात आले. मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले. मुख्य हल्ला केला त्यावेळी वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला. पुलवामाचा बदला : ऐकले नाही म्हणून ठोकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईला दुजोरा   जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. अजहरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली. मात्र पाकने काही पावले उचलली नाहीत. काल रात्री भारतीय वायुदलाने बालकोटमधील जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. हा हल्ला ट्रेनिंग कॅम्पवरच केला. हा कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा मेहुणा होता, असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असंही त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Embed widget