एक्स्प्लोर

56 वर्षे लांबलेल्या सरदार सरोवर धरणाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1961 मध्ये या धरणांचं भूमिपूजन केलं होतं. त्यानंतर आज या धरणाचं लोकार्पण करण्यात आलं आहे.

गांधीनगर : विस्थापितांचा प्रश्न, न्यायालयीन लढाया यामुळे तब्बल 56 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सरदार सरोवर धरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलं. मोदींनी आपल्या 67 व्या वाढदिवसाचं निमित्त साधून या धरणाचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर एकप्रकारे गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलही फुंकलं. अहमदाबादपासून 200 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे. एका अंदाजानुसार तब्बल पाच लाख कुटुंबांना धरणामुळे विस्थापित व्हावं लागलं. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी याविरोधात नर्मदा बचाव आंदोलन पुकारलं होतं. त्या आजतागायत या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1961 मध्ये या धरणांचं भूमिपूजन केलं होतं. त्यानंतर आज या धरणाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. सरदार सरोवर धरणाची वैशिष्ट्यं काय? नर्मदा कंट्रोल अथॉरिटीच्या सूचनेनुसार 17 जून रोजी बंद केलेले धरणाचे 30 दरवाजे पंतप्रधानांनी उघडले. पूर्वी धरणाची उंची 121.92 मीटर होती. दरवाजे बंद केल्यावर ती 138 मीटरपर्यंत वाढली. या धरणाची जलसाठा क्षमता 4.3 दशलक्ष क्युबिक मीटर्स इतकी आहे. धरणामुळे 18 लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येईल, तसंच नर्मदेचं पाणी कालव्यांतून नऊ हजार गावांमध्ये खेळवलं जाईल, असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सांगितलं. धरणाचा प्रत्येक दरवाजा 450 टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा कालावधी लागतो. काँक्रिटच्या सर्वाधिक वापरामुळे सरदार सरोवर धरण चर्चेत आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठं धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचं नाव घेतलं जातं. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी 57 टक्के वीज महाराष्ट्र, 27 टक्के वीज मध्य प्रदेश तर 6 टक्के वीज गुजरात वापरणार आहे. 1.2 किमी लांब धरणावरील प्रकल्पाने आजवर 4 हजार 141 कोटी युनिट वीजनिर्मिती केली आहे. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे 1996 साली धरणाचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने 2000 मध्ये पुन्हा हे काम सुरु करण्याचे आदेश दिलं. त्यानंतर धरणाचं काम पुन्हा वेगाने सुरु करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget