PM Meeting On Corona: देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उच्च स्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. सध्या तरी कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हेच प्रमुख अस्त्र असल्याचं बोललं जात आहे. देशभरात सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. सध्या देशात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव त्यापाठोपाठ नवरात्र मग दिवाळी अशा सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पीटीआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि कोरोना लस या विषयी केली.
Ganesh Chaturthi 2021: पंतप्रधान मोदी म्हणाले, गणपती बाप्पा मोरया, मराठीतून दिल्या खास शुभेच्छा
58 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस
ही बैठक अशा वेळी घेण्यात आली आहे की, कालच केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. देशातील 35 जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा दर10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर 30 जिल्ह्यात हा दर 5 ते 10 टक्क्यांमध्ये आहे. सरकारने गुरुवारी सांगितले की, देशातील 58 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 18 टक्के नागरिकांना दोन्ही लस देण्यात आली आहे. या बरोबरच देशात आतापर्यंत 72 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त तीन आठवडयांचा जंगी कार्यक्रम भाजपकडून तयार
PM chairs high-level meeting to review COVID situation and vaccination: Govt sources
— Press Trust of India (@PTI_News) September 10, 2021
गेल्या 24 तासात 35 हजार रुग्णांची भर
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार जरी दिसत असला तरी अद्याप कोरोनाच्या संकटाचे ढग कायम आहेत. गेल्या काही दिवासांपासून देशातील रुग्णसंख्या ही 30 ते 40 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात 34 हजार 976 नव्या रुग्णांची भर पडली तर 260 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 37,681 जण कोरोनामुक्त झाले. काल एकाच दिवसात देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही जवळपास तीन हजारांनी कमी झाली. त्या आधी बुधवारी देशात देशात 43,263 कोरोनाबाधितांची भर पडली होती तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता.
केरळमध्ये कोरोनाचे संकट कायम
केरळमध्ये कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात येताना दिसत नाही. गेल्या 24 तासात केरळमध्ये 26 हजार 200 नव्या रुग्णांची भर पडली तर 125 जणांचा मृत्यू झाला.