एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पंतप्रधान मोदींना यंदाचा 'सोल पीस प्राईज'
12 सदस्यीय समितीने जगभरातील 100 पेक्षा जास्त उमेदवारांमधून भारताच्या पंतप्रधानांची निवड केली.
![पंतप्रधान मोदींना यंदाचा 'सोल पीस प्राईज' PM Narendra Modi awarded the 2018 Seoul Peace Prize पंतप्रधान मोदींना यंदाचा 'सोल पीस प्राईज'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/11201146/modi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोल : भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासातील योगदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (वय 68 वर्ष) यांना यंदाचा सोल पील प्राईज देण्यात येणार आहे. सोल पीस प्राईज कल्चरल फाऊंडेशनने आज (24 ऑक्टोबर) ही घोषणा केली आहे. दक्षिण कोरियातील या फाऊंडेशनने श्रीमंत आणि गरिबांमधील सामाजिक आणि आर्थिक दरी कमी करण्यासाठी 'मोदीनॉमिक्स'ची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदींना मानचिन्हासह दोन लाख डॉलर म्हणजेच सुमारे 1.46 कोटी रुपयांची रक्कम प्रदान केली जाणार आहे.
निवड समितीचे अध्यक्ष चो चुंग-हू म्हणाले की, 12 सदस्यीय समितीने जगभरातील 100 पेक्षा जास्त उमेदवारांमधून भारताच्या पंतप्रधानांची निवड केली. पुरस्कारांच्या दावेदारांमध्ये विद्यमान आणि माजी राष्ट्रपती, राजकीय नेते, उद्योजक, धार्मिक नेता, स्कॉलर, पत्रकार, कलाकर, अॅथलीट, आंतरराष्ट्रीय संघटना इत्यादींचा समावेश आहे. या समितीने मोदींना 'परफेक्ट कँडिडेट' असल्याचं मान्य केलं आहे. सोल पीस प्राईज मिळवणारे पंतप्रधान मोदी हे चौदावे विजेते आहेत.
समितीने पंतप्रधान मोदींच्या सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी तसंच नोटाबंदी यांसारख्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. सक्रिय परदेशी धोरणाद्वारे प्रादेशिक आणि जागतिक शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी समितीने 'मोदी डॉक्ट्रिन' आणि 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी'चंही कौतुक केलं आहे. दक्षिण कोरियाचा हा पुरस्कार जिंकणाऱ्यांमध्ये संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान आणि बान की-मून यांचाही समावेश आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची घोषणा झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "जगाने मान्य केलं आहे. जागतिक शांती, मनुष्याच्या विकासात सुधारणार आणि भारतात लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने त्यांच्या योगदानासाठी पंतप्रधानांना सोल पीस प्राईज देण्यात येणार आहे."The world acknowledges. PM @narendramodi awarded prestigious Seoul Peace Prize 2018 for contribution to high economic growth in India and world through 'Modinomics', contribution to world peace, improving human development & furthering democracy in India. https://t.co/ugXhhG7Dls pic.twitter.com/5e98THX4M8
— Raveesh Kumar (@MEAIndia) October 24, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)