एक्स्प्लोर
मोदींच्या 'कडक चहा'नं गरीबांना अल्सर होतो आहे: अमरिंदर सिंह

चंदीगड: नोटबंदी हे अमानवी आणि कोणत्याही योजनेविना उचललेलं पाऊल आहे. असं म्हणत पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह यांनी मोदी सरकारवकर टीका केली आहे.
'लोकांचा मृत्यू होत आहे. तुमच्या 'कडक चहा'ने गरीबांच्या रिकाम्या पोटात 'अल्सर' होत आहे.' असं म्हणत अमरिंदर सिंह यांनी मोदीच्या 'कडक चहा'वर निशाणा साधला.
'नोटाबंदीच्या निर्णयाची जर तात्काळ समीक्षा केली नाही तर मोदी आणि त्यांच्या सरकारवर हा निर्णय उलटू शकेल. या निर्णयानं गरीबांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.' असं अमरिंदर सिंह म्हणाले.
'श्रीमंत लोकांना मोदींच्या या निर्णयाची आधीच गुप्त माहिती मिळाली होती.' असाही त्यांनी आरोप केला.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
























