एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परीक्षेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, सकाळी 11 वाजता मोदींचा कानमंत्र
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी एका निबंध स्पर्धेच्या माध्यमातून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'परीक्षा पे चर्चा 2020' या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये लवकरच दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासाबाबत निराश आणि हताश होणाऱ्या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी आज करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत ते परीक्षा आणि विद्यार्थ्यांवर येणार ताण या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत . दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी एका निबंध स्पर्धेच्या माध्यमातून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर निबंध लिहिले. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या कार्यक्रमाची जबाबदारी मनुष्यबळ संसाधन मंत्रायलयाकडे सोपविण्यात आली होती. आणि यासाठी एक बजेट देखील तयार करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी तब्बल सहा कोटी रूपये विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी आणि प्रवासासाठी खर्च करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी परीक्षेदरम्यान येणारा तणाव याविषयी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडावे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
Chandrapur Fire | झी बाजार या दुकानाला भीषण आग, चार कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज | चंद्रपूर | ABP Majha
'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना विचारण्यासाठी जे प्रश्न पाठवले आहेत. त्यापैकी बरेचशे प्रश्न अभ्यास, परीक्षेचा ताण आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही प्रश्न सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि अर्थकारणाशीही संबंधित आहेत. परंतु कार्यक्रमाचे स्वरूप अराजकीय असल्यामुळे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा, वाचन-लेखन आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न पंतप्रधानांना विचारता येणार आहेत.
केंद्रीय विद्यालयाचे दोन विद्यार्थी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. तीन वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली होती. या चर्चेचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम दिसून आल्याने याचे स्वरूप व्यापक कjण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे.
संबंधित बातम्या :
Delhi Election : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, केजरीवाल नवी दिल्ली मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार
मोदींच्या मंत्रिमंडळात के व्ही कामथ आणि स्वपन दासगुप्ता यांची वर्णी लागण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
शिक्षण
Advertisement