एक्स्प्लोर
गरिबांच्या खात्यात पैसे टाकले तर ते गरिबांचेच : पंतप्रधान मोदी
लखनऊ : नोटाबंदीनंतर गरिबांच्या जनधन खात्यात पैसे टाकले जात आहेत. यानंतर गरिबांच्या खात्यात असे पैसे आले तर ते संबंधित खातेधारकाचेच होतील, शिवाय पैसे टाकणाऱ्यावर कारवाई होईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये भाजपच्या परिवर्तन रॅलीला संबोधित करताना नोटाबंदीनंतरच्या गैरप्रकारांवर मोदींनी प्रकाश टाकला. ज्यांनी बेकायदेशीर प्रकारे गरिबांच्या खात्यात पैसे टाकले ते तुरुंगात जाणार आणि ते पैसे गरिबांचे होणार, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
दरम्यान ज्यांच्या खात्यात कसलीही कल्पना नसताना पैसे जमा झाले आहेत, त्यांनी त्याचा वापर आत्ताच करु नये, असंही मोदींनी सांगितलं. कारण पैसे टाकणाऱ्यांना शिक्षा होईल आणि त्यानंतरच हा पैसा गरिबांचा होईल, असं मोदी म्हणाले.
बँकांबाहेर रांगेत उभी राहणारी जनता प्रमाणिक आहे. पण गरिबांच्या घराबाहेर आता श्रीमंत रांगा लावत आहेत, असंही मोदी म्हणाले.
देशाचा विकास साधायचा असेल तर उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांसारख्या मोठ्या राज्यांचा विकास होणं गरजेचं आहे, असं मोदींनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement