(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WhatsApp Channel: व्हॉट्सअॅप चॅनलवर जोडले गेले मोदी; कसं करायचं फॉलो? जाणून घ्या
PM Modi On WhatsApp: व्हॉट्सअॅप यूजर्सना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधित प्रत्येक माहिती त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅनलवर मिळू शकणार आहे.
PM Modi Joins WhatsApp Channel: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) व्हॉट्सॲप चॅनल जॉईन केलं आहे. सोशल मेसेजिंग ॲपमध्ये चॅनलचं हे फिचर नुकतंच सादर करण्यात आलं आहे. व्हॉट्सॲप (Whatsapp) चॅनलद्वारे ॲडमिनला इतरांसोबत संदेश, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि पोल्स शेअर करता येतात. व्हॉट्सॲपच्या या नवीन फिचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे चॅनेल देखील फॉलो करू शकतात.
जर तुम्ही एखाद्याचं चॅनेल फॉलो केलं, तर तुमचा फोन नंबर चॅनलच्या ॲडमिनला किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही. याशिवाय चॅनल ॲडमिनला स्क्रीनशॉट आणि फॉरवर्ड ब्लॉक करण्याचा पर्यायही मिळतो.
तुम्हाला मिळणार पंतप्रधानांशी संबंधित प्रत्येक अपडेट
व्हॉट्सॲपने नुकतंच आपल्या ॲपमध्ये हे फिचर आणलं आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन झाले आहेत. व्हॉट्सॲप युजर्सना आता पंतप्रधानांचे सर्व अपडेट्स चॅनलवरही मिळू शकणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी चॅनलवर केली पहिली पोस्ट
त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनलवरील पहिल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, "व्हॉट्सॲप समुदायात सामील होण्यासाठी मी उत्सुक आहे! हे आपल्या अखंड संवादाचं आणखी एक माध्यम आहे. चला इथे कनेक्ट होऊया! नवीन संसद भवनाचं हे चित्र आहे..."
व्हॉट्सॲप चॅनल काय आहे?
व्हॉट्सॲपने फायनली आपलं ‘चॅनल’ हे नवीन फीचर सादर केलं आहे. या चॅनल फिचरच्या मदतीने एकाच वेळी अनेकांना व्हॉट्सॲपद्वारे विविध गोष्टी पाठवता येतील. म्हणजेच एकावेळी एका मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज (फोटो, व्हिडीओ) प्रसारित केले जाऊ शकतात. तर व्हॉट्सॲप चॅनल हे फीचर कॉलेज, कंपन्या, नेते, अभिनेते-अभिनेत्री, कलाकार आणि विविध संस्थांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. हे कुटुंबीय आणि मित्रांशी ग्रुपमध्ये चॅट करण्यापेक्षा वेगळं आहे.
तुमचा नंबर इतर फॉलोअर्सना दिसणार नाही
तुम्ही एखाद्या चॅनलला फॉलो केलं तर तुमचा फोन नंबर चॅनल ॲडमिन किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही. तुम्हाला कोणाला फॉलो करायचं? किंवा कोणत्या चॅनलला फॉलो करायचं? हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल.
युजर्स सर्च करु शकतात विविध चॅनल
व्हॉट्सॲप युजर्स एखाद्या चॅनलला फॉलो करण्यासाठी त्या नावाने चॅनल शोधू शकतात. याशिवाय, तुम्ही असे चॅनल देखील पाहू शकता ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत आणि जे चॅनल अधिक लोकप्रिय आहेत.
हेही वाचा:
New Parliament: नव्या संसदेत कंगना रणौत आणि ईशा गुप्ताची एन्ट्री; म्हणाल्या, निवडणूक नक्कीच लढणार!