Mann Ki Baat: टांझानियन भाऊ-बहिणीने पंतप्रधान मोदी यांना केलं इम्प्रेस, मन की बातमध्ये केलं कौतुक
टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत.
![Mann Ki Baat: टांझानियन भाऊ-बहिणीने पंतप्रधान मोदी यांना केलं इम्प्रेस, मन की बातमध्ये केलं कौतुक PM Modi mann ki baat today like Kili paul Neema I urge everyone different states make lip-syncing videos popular songs Mann Ki Baat: टांझानियन भाऊ-बहिणीने पंतप्रधान मोदी यांना केलं इम्प्रेस, मन की बातमध्ये केलं कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/6d9ecf02ca8a2acb781b9b7e8d1d0bcd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत. या भाऊ-बहिणीने आपल्या व्हिडीओने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील इम्प्रेस केलं आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल (Neema Paul) यांचे खूप कौतुक केले आहे. ते म्हणाले आहेत की, ''दोघांनाही भारतीय संगीताची आवड आहे. भारतीय संगीताच्या त्यांच्या या आवडीमुळे ते खूप लोकप्रिय देखील झाले आहेत.''
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, "टांझानियाचे भाऊ - बहीण किली पॉल आणि त्याची बहीण निमा यांची खूप चर्चा आहे. मला खात्री आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच ऐकले असेल." ते म्हणाले, "त्यांना भारतीय संगीताची आवड आहे. म्हणूनच ते खूप लोकप्रिय आहेत.''
भारतीय उच्चायुक्तालयाने किली पॉलला केले होते सन्मानित
अलीकडेच टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने किली पॉल याला सन्मानित केलं होत. किली पॉल हा बॉलीवूड गाण्यावर लिपसिंक करून जगभरात प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॅन फॉलोअर्स आहेत. इतकेच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्सही त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात.
भारतात अचानक कसा प्रसिद्ध झाला किली पॉल
गेल्या वर्षी 'शेरशाह' चित्रपटातील हिट गाणं 'राता लंबिया' या गाण्याचे बोल पॉलने लिपसिंक करतानाचा व्हिडिओ चर्चेत आला होता. या व्हिडिओमध्ये तो त्याची बहीण नीमा पॉलसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर किली पॉल हा भारतात खूप प्रसिद्ध झाला आहे.
View this post on Instagram
संबंधित इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)