एक्स्प्लोर
तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते : सर्व्हे
21 फेब्रुवारी ते 10 मार्च म्हणजेच उत्तर प्रदेश निवडणुकांच्या काळात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. या सर्व्हेमध्ये देशातल्या 2464 लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते.
![तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते : सर्व्हे PM Modi is India’s most popular leader in Indian politics : Pew Survey तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते : सर्व्हे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/16121612/Modi_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही सर्वात लोकप्रिय नेते आहे. अमेरिकन सर्व्हे एजन्सी प्यू रिसर्च सेंटरने हे सर्वेक्षण केलं आहे.
सर्व्हेचे आकडे काय सांगतात?
या सर्व्हेनुसार, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 अंकांनी पुढे आहेत. 58 टक्के लोकांना राहुल गांधी आवडतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 88 टक्के लोकांनी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून निवड केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना 57 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 39 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत.
कधी झाला सर्व्हे?
21 फेब्रुवारी ते 10 मार्च म्हणजेच उत्तर प्रदेश निवडणुकांच्या काळात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. या सर्व्हेमध्ये देशातल्या 2464 लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते.
सर्व्हेबाबत प्यू एजन्सीच्या मते, 'भारतीय अर्थव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास वाढला आहे आणि लोक बदलांचं सकारात्मकरित्या स्वागत करत आहेत. यावरुन मोदींची लोकप्रियता कायम असल्याचं दिसतं.'
सर्व्हेत अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा
सर्व्हेमध्ये 10 पैकी 8 जणांनी मान्य केलं की, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप चांगली आहे. सर्वेक्षणात 30 टक्के प्रौढांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं म्हटलं आहे. मोदी ज्या दिशेने देशाला घेऊन पुढे जात आहेत ते पाहता 10 पैकी 7 लोक त्यावर समाधानी आहेत, असं प्यूच्या सर्व्हेमधून समोर आलं आहे.
राज्यातील लोकांचं मत काय?
या सर्वेक्षणानुसार, दक्षिण भारताच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा तर पश्चिम भारताच्या महाराष्ट्र, छत्तीसगड आणि गुजरातमधील 10 पैकी 9 लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे.
पूर्वोत्तर राज्यांमधील बिहार, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल तर उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील 10 पैकी 8 लोकांची पहिली पसंती नरेंद्र मोदी आहे.
2015 च्या तुलनेत उत्तर भारतात पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. तर पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात मोदींची लोकप्रियता वाढली आहे. मात्र पूर्वोत्तर भारतात पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
![Modi_2](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/16121636/Modi_2.jpg)
![Modi_3](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/16121712/Modi_3.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)