एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वडनगर सजलं, पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच जन्मगावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील त्यांच्या वडनगर या जन्मगावी जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर वडनगरला जाण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील त्यांच्या वडनगर या जन्मगावी जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर वडनगरला जाण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे.
मोदींच्या स्वागतासाठी वडनगरला उत्सवनगरीचं स्वरुप आलं असून प्रवेशद्वारावरच थ्री-डीच्या माध्यमातून मोदींच्या बालपणापासूनच्या फोटोंचं सादरीकरण सुरु आहे.
मोदींच्या हस्ते 600 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय मोदी वनडनगर रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन करतील. त्यानंतर मोदींच्या हस्ते इंटेसिफाय इंद्रधनुष्याचं लाँचिंग केलं जाणार आहे.
वडनगर रेल्वे स्टेशनवरील ज्या स्टॉलमध्ये मोदींनी चहा विकला होता, तो स्टॉलही सजवण्यात आला आहे. पर्यटन आणि रेल्वे मंत्रालयाकडून हा स्टॉल पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जात आहे. मोदींच्या आठवणी असलेल्या वनडनगरमधील इतर स्थळांचाही विकास केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement