एक्स्प्लोर

देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

PM Modi in Lok Sabha : भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली आहे. पण कोरोना महामारीमध्येही विरोधकांनी राजकारण केलं आहे. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे.

PM Modi in Lok Sabha :  भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली आहे. पण कोरोना महामारीमध्येही विरोधकांनी राजकारण केलं आहे. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटं काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर त्यांनी चांगलीच टीका केली. 

कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा आरोप संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांनी जिथं आहात तिथंच थांबा, असं म्हटलं होतं. पण काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. कोरोना लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तर हद्दच केली, त्यांनी मुंबईतल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली आणि महाराष्ट्रावरील बोजा कमी करण्याचं आवाहन केलं. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला. यूपी बिहारमध्ये जाऊन कोरोना पसरवा असं ते स्थलांतरीत मजुरांना सांगत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. यावेळी सभागृहात काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गोंधळही घातला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘पराभवानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेसला मते नाहीत. गोव्यात पुन्हा सत्ता मिळाली नाही. मतदार काँग्रेसला नाकारत आहेत. विरोधक 2014 च्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. उपदेश देताना काँग्रेस सत्तेतील 50 वर्ष विसरत आहे.’

दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये काही बदल झाला आणि एक नवीन वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित झाली. त्यानंतर जग बदललं. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा जग नव्या वर्ल्ड ऑर्डरच्या दिशेने प्रवास करत असून जगामध्ये बदलाचं वारं वाहत आहे. ही संधी भारताने आपल्या हातून सोडू नये, भारताला एक महत्त्वाचा देश म्हणून उभारणं गरजेचं आहे. देशाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी आपण काही संकल्प केल्यास, पूर्ण शक्तीने काम केल्यास त्याचा परिणाम सकारात्मक होईल असं प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. नवे संकल्प घेऊन देश पुढे जात आहे. गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधेत भारतानं वेगाने प्रगती केली. पंतप्रधान आवास योजनेमुळे गरीबांना घरे मिळाली आहेत. पंतप्रधान आवास योजनेमुळे गरीबांना घरं मिळाली. घरं मिळाल्यामुळे गरीबदेखील लखपती झाला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.    

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Gajanan Kale vs Navnath Ban : मतदारयाद्यांच्या घोळावरुन काळे-बन आमनेसामने
Zero Hour Gajanan Kale : मतदारयाद्यांच्या पडताळणीला भाजप-शिंदेंच्या सेनेचा आक्षेप का?
Zero Hour Susieben Shah : सत्याचा नाही तर सत्तेसाठी मोर्चा,सुसीबेन शाहांचा हल्लाबोल
Pawar vs Mohol: 'अध्यक्ष म्हणून मी देखील जबाबदार', ऑलिम्पिक संघटनेवरून Ajit Pawar यांना Sandeep Joshi यांचा इशारा
Vande Mataram Mandate: 'भारत में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', Abu Azmiं विरोधात भाजप आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
Embed widget