एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना, नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद
सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असल्यानं कर्तव्य बजावत असताना काल ही दुर्घटना घडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. लहानपणापासूनच त्यांना सैन्यात जाण्याची आवड होती.
श्रीनगर : श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एअरफोर्समधील नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 6 जवान शहीद झाले. या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे हे देखील शहीद झाले. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे.
नाशिकच्या डीजीपीनगर जवळील बँक ऑफ इंडिया कॉलनीत त्यांचे आई वडील राहतात. नोकरी निमित्ताने ते लखनऊमध्ये पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. सध्या त्यांचे पोस्टिंग श्रीनगरला होते. औरंगबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे विद्यार्थी होते. तिथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएत झाली आणि ते हेलिकॉप्टर पायलट झाले. 2009 मध्ये तो एअरफोर्स मध्ये दाखल झाले होते. एअरफोर्समध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू होऊन गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती. ज्यानंतर ही दुःखद घटना घडली आहे.
सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असल्यानं कर्तव्य बजावत असताना काल ही दुर्घटना घडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. लहानपणापासूनच त्यांना सैन्यात जाण्याची आवड होती. चार दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यासाठी त्यांचे आईवडील लखनऊला गेले असल्यानं नाशिकच्या घराला कुलूप आहे, मात्र ही बातमी परिसरात पसरल्याने आजूबाजूच्या नागरिकांना दुःख अनावर झाले आहे.
निनादचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून आईही सेवेतून सेवानिवृत्त झाली आहे. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा असून लहान मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत आहे. आमच्या कुटुंबाचा आधारच गेला अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली आहे. निनादने आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नावं मोठं केलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असल्याची भावना निनादच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement