एक्स्प्लोर
पेट्रोलपंप चालकांकडून दोन दिवस 'इंधन खरेदी बंद' आंदोलन
मुंबई: देशातल्या ऑईल कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत उद्या आणि परवा देशभरातील पेट्रोलपंप चालकांकडून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्यात येणार आहे.
इंडियन पेट्रोल डिलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार हे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 19 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरूवात झाली होती. मात्र, ऑईल कंपन्यांबरोबरच सरकारनंही त्याकडे दुर्लक्ष केल्यानं पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.
या आंदोलनामुळे येत्या दोन दिवसांत पेट्रोलची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याआधी फामपेडानं आपल्या अनेक मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे या आंदोलनानं देशभरातील ग्राहकांना फटका बसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement