एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : आज पुन्हा कडाडलं कच्चं तेल; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरही परिणाम होणार?

Petrol-Diesel Price Today 5th July 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ उतार सुरु आहे. तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today 5th July : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 24 तासांत पुन्हा वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत आज सुमारे 114 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली, जी सोमवारी सकाळी 111 डॉलर इतकी होती. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील पेट्रोल (Petrol) -डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. जवळपास दीड महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 

यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर इंधनाचे दर स्थिर आहेत. ज्यावेळी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतंं. केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनीही व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा होता. पण महाराष्ट्रात मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. तत्कालीन ठाकरे सरकारवर त्यावेळी विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. अशातच आता महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत बोलताना पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. 

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंधन दर स्थिर आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget