एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : दिलासा की, खिशाला कात्री; पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, झटपट चेक करा

Petrol-Diesel Price Today 25 July 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 25 July 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel) जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये भारतीय तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर (Diesel) स्थिर आहेत. दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. 

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) ची अधिकृत वेबसाईट iocl.com नं दिलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशभरात पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे महागाईच्या गर्तेत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना काहीसा का होईना दिलासा मिळाला आहे. 

iocl.com नं जाहीर केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. 

कच्च्या तेलाचे दर काय? 

डब्ल्यूटीआय क्रूडची (Crude Oil) किंमत प्रति बॅरल 0.46 अंक म्हणजेच, 0.49% वाढून 95.16 डॉलरवर पोहोचली आहे. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 103.7 डॉलरवर पोहोचलं आहे. यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कातही कपात केली होती, त्यामुळे पेट्रोल 8 रुपयांनी तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झालं होतं. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर अनेक राज्यांनीही व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला होता. 

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवरुन देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं घसरण होत राहिल्यास राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतं, असं तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget