Petrol Diesel 11 July : देशभरात इंधनांचे दर आज स्थिर; पेट्रोल शंभरीपार, तर डिझेल शतक गाठण्याच्या तयारीत
Petrol Diesel Price Today 11 July : इंधन दरवाढीचं सत्र सुरु असतानाच काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
Petrol Diesel Price Today 11 July : देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरु असतानाच आज काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. एका दिवसापूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 35 पैसे आणि 26 पैसे प्रिती लिटर वाढ करण्यात आली होती. त्यानंतर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव 100.91 रुपये आणि डिझेलचा भाव 89.88 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं होतं.
डिझेलची किंमत संपूर्ण देशात शतक पार करण्याच्या तयारीत आहे. मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलचे दर पहिल्यांदाच शंभरीपार पोहोचली आहे. शनिवारी पेट्रोलची किंमत 106.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. शहरात डिझेलची किंमत वाढून 97.44 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.
प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
मुंबईमध्ये आज पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 97.46 रुपये प्रति लिटर
चेन्नईत आज पेट्रोल 101.67 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर
कोलकातात आज पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर
बंगळुरुमध्ये आज पेट्रोल 104.29 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर
चंदीगडमध्ये आज पेट्रोल 97.04 रुपये आणि डिझेल 89.51 रुपये प्रति लिटर
लखनौमध्ये आज पेट्रोल 98.01 रुपये आणि डिझेल 90.27 रुपये प्रति लिटर
रांचीत आज पेट्रोल 95.96 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये प्रति लिटर
पाटनात आज पेट्रोल 103.18 रुपये आणि डिझेल 95.46 रुपये प्रति लिटर
भोपाळमध्ये आज पेट्रोल 109.24 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर
वैश्विक स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आता 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये ही 80 रुपये प्रति बॅरलहून अधिक होती. परंतु, तरिही देशात पेट्रोलची किंमत जवळपास 80 रुपये प्रति लिटरच्या आसपास होती. परंतु, आता तेलाची किंमत कमी असूनही पेट्रोलची किंमत शंभरीपार पोहोचली आहे.
दोन महिन्यांत 9.81 रुपयांनी महागलं
गेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशाच्या राजधानीत 1 मे रोजी पेट्रोलचे दर 90.40 रुपये प्रति लिटर इतका होता. तर आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटरनं विकलं जात आहे. गेल्या 68 दिवसांत 9.81 रुपेयांनी पेट्रोलच्या किमतींत वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत गेल्या दोन महिन्यांपासून 8.80 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. मे आणि जून दरम्यान 61 दिवसांत 32 दिवशी इंधनाच्या दरांत वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Indian Railway : रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आता दोन शिफ्ट; पदभार स्वीकारताच रेल्वेमंत्र्यांचा शिस्तीचा कार्यक्रम
- विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण निश्चित करावं; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ, 11 जुलैपासून दरवाढ लागू होणार
- RTI : माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीवर अवलंबून राहू नका : सुप्रीम कोर्ट